NEET UG : हॉल तिकिटावर आवश्यक माहिती ठळक नसेल ; तर परीक्षेला प्रवेश नाही  

हॉल तिकिटावर उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी आणि रोल नंबर बारकोड आदी माहिती ठळकपणे प्रदर्शित होत नसेल , तर उमेदवारना परीक्षा हॉल मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

NEET UG : हॉल तिकिटावर आवश्यक माहिती ठळक नसेल ; तर परीक्षेला प्रवेश नाही  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG 2024 : National Eligibility-cum-Entrance Test ( NEET UG ) परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असताना नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA  ने आणखीन एक महत्वाची सूचना प्रसिध्द केली आहे. हॉल तिकिटावर (hall ticket)उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी आणि रोल नंबर बारकोड आदी माहिती ठळकपणे प्रदर्शित होत नसेल, तर उमेदवारना परीक्षा हॉल मध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे निर्देश NTA कडून देण्यात आले आहेत.

NTA ने म्हटले आहे की, "NEET (UG) – 2024 परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कृपया तुमच्या प्रवेशपत्राबाबत खालील गोष्टी लक्षात ठेवा: तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि रोल नंबर बारकोड तुमच्या डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रावर ठळकपणे प्रदर्शित केलेला असावा. हे तपशील चाचणी दरम्यान कागदपत्रांची ओळख आणि पडताळणीसाठी महत्त्वाचे आहेत."

हेही वाचा : NEET UG परीक्षेला बसता येणार नाही; त्यामुळे या गोष्टी सोबत घेऊन जाणे टाळा

"तुम्हाला तुमच्या प्रवेशपत्रात काही आवश्यक घटक गहाळ आढळल्यास, कृपया NTA वेबसाइट https://exams.nta.ac.in/NEET/ वरून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा. तसेच उमेदवार 011-40759000 वर संपर्क साधू शकतात किंवा नवीन हॉल तिकीटासाठी JEN वर neet@nta.ac.in वर ई-मेल करू शकतात." अशा सूचना NTA कडून देण्यात आल्या आहेत. तसेच  NTA ने उमेदवारांना NTA च्या अधिकृत वेबसाइट https://www.nta.ac.in/ आणि https://exams.nta.ac.in/NEET/ ला भेट देण्याचा सल्ला दिला आहे.