‘बीसीआय’ने पुन्हा बदलली परीक्षेची तारीख; अर्ज करण्यासही मुदतवाढ

ऑल इंडिया बार परिक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर  पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑल इंडिया बार परीक्षा आता ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

‘बीसीआय’ने पुन्हा बदलली परीक्षेची तारीख; अर्ज करण्यासही मुदतवाढ
BCI-AIBE

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

बार कौन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India) पुन्हा एकदा ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) या परीक्षेची तारीख बदलली आहे. दि. २६ नोव्हेंबर  रोजी होणारी ऑल इंडिया बार परीक्षा आता ३ डिसेंबर रोजी होणार आहे. बीसीआयने केवळ परीक्षेची तारीखच बदलली नाही, तर नोंदणीची अंतिम तारीखही बदलली आहे.   

 

नवीन तारखेनुसार, ऑल इंडिया बार परिक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर  पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार BCI-AIBE च्या अधिकृत वेबसाइट, allindiabarexanation.com ला भेट देऊन या संदर्भात जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. आता नवीन उमेदवारही  ते निर्धारित वेळेत अर्ज करू शकतात. 

शासनाने चूक सुधारली; कनिष्ठ अभियंता भरतीतील शैक्षणिक पात्रतेत बदल

 

सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबरपर्यंत आहे. यानंतर उमेदवारांना शुल्क भरण्यासाठी ११ नोव्हेंबर  पर्यंत वेळ देण्यात आली आहे.  यानंतर, नोंदणी फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर आहे. उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये १२ नोव्हेंबर पर्यंत दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर २५ नोव्हेंबर  रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील. उमेदवारांना ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशपत्र डाउनलोड करता येतील, अशी सूचना AIBE कडून करण्यात आली आहे. 

 

असा करा अर्ज 

* सर्वप्रथम allindiabarexanation.com या अधिकृत साइटला भेट द्या 

* आता होमपेजवरील AIBE XVIII 2023 लिंकवर क्लिक करा.

* आता स्वतःची नोंदणी करा आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर लॉगिन करा. 

* अर्ज भरा आणि अर्ज फी भरा. त्याची प्रिंटआउट घ्या

 

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k