NEET PG 2024 Exam : नीट पीजी परीक्षेचे हॉल तिकिट आजपासून उपलब्ध

या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र natboard.edu.in या वेबसाईटवरून परीक्षेच्या तारखेपर्यंत डाउनलोड करू शकणार आहेत.

NEET PG 2024 Exam : नीट पीजी परीक्षेचे हॉल तिकिट आजपासून  उपलब्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET PG 2024) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे. NEET PG 2024 परीक्षेचे हॉल तिकिट (Halltickets ) मंगळवार (दि.18) पासून डाऊनलोड करण्यास उपलब्ध होणार आहे. जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार त्यांचे हॉल तिकिट natboard.edu.in या वेबसाईटवरून परीक्षेच्या तारखेपर्यंत डाउनलोड करू शकणार आहेत.  

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBEMS) ने 23 जून रोजी NEET PG 2024 परीक्षेचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. या परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केला जाणार आहे, ज्यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी समुपदेशन (counselling) आयोजित केले जाईल. दुसरीकडे, NEET PG 2024 साठी आवश्यक इंटर्नशिप (Internship) पूर्ण करण्याची कट-ऑफ तारीख १५ ऑगस्ट २०२४ अशी सेट केली गेली आहे.

असे करा प्रवेशपत्र डाउनलोड

Internship हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना परीक्षा (Exams) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर प्रवेश परीक्षांमध्ये (ENTRANCE EXAMINATIONS) NEET PG च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, प्रवेश पत्र (NEET PG Halltickets 2024) डाउनलोड लिंक उघडलेल्या पृष्ठावर सक्रिय होईल. या लिंकद्वारे, उमेदवार त्यांच्या युजर आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करून त्यांचे हॉल तिकिट डाउनलोड आणि प्रिंट करू शकतील.