SPPU News : विद्यापीठातील 'एनसीसी'चे विद्यार्थी प्रथमच देणार 'दाहिना सॅल्युट'
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये एनसीसी युनिट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु विद्यापीठात मागील वर्षी एनसीसीचे युनिट सुरू करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) राष्ट्रीय छात्र सेना (NCC) युनिट सुरू झाले असून यंदा पहिल्या तुकडीकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) आयोजित कार्यक्रमात प्रथमच विद्यापीठाच्या कुलगुरूंना (Vice Chancellor) 'दाहिना सॅल्यूट' दिला जाणार आहे. सुमारे दीड महिन्यांपासून विद्यार्थी स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या परेडची तयारी करत आहेत.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये एनसीसी युनिट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु विद्यापीठात मागील वर्षी एनसीसीचे युनिट सुरू करण्यात आले. विद्यापीठातील कौशल्य विभाग, शिक्षणशास्त्र विभाग, तंत्रज्ञान विभाग, इंटरडिसिप्लिनरी स्कूल सायन्स आदी विभागातील ३४ विद्यार्थ्यांनी या युनिटमध्ये प्रवेश घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची विद्यापीठाला तंबी; समान संधी केंद्र नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा!
प्रजासत्ताक दिनानिमित्त या युनिटने तत्कालीन कुलगुरूंसमोर प्रथमच संचलन केले होते. आता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना १५ ऑगस्ट रोजी दाहिना सॅल्यूट दिला जाणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींनाच हा मान दिला जातो. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, त्यांच्यात नेतृत्व आणि सार्वभौम सेवेची भावना विकसित व्हावी या उद्देशाने विविध महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये एनसीसी युनिट चालवले जाते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैन्य दलाच्या दाखल होण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम प्रवेश घेतलेले ३४ विद्यार्थी याबाबतचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. १५ ऑगस्ट रोजी या विद्यार्थ्यांमध्ये चार जण पायलेटिंग करणार आहेत. कुलगुरूंचे स्वागत करून त्यांना ध्वजारोहण करण्याबाबत विनंती करणार आहेत. यावेळी कुलगुरू विद्यार्थ्यांचे निरीक्षण करणार आहेत, असे एनसीसी युनिटचे सुरज शिंदे यांनी सांगितले.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com