विद्यार्थी, शिक्षकांसाठी  ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’; चाळीस जणांना मिळतात ६० हजार रुपये

चालू शैक्षणिक वर्षात (२०२३ -२४ ) महाराष्ट्रातील २० प्राथमिक आणि २० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात आली.

विद्यार्थी, शिक्षकांसाठी  ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’; चाळीस जणांना मिळतात ६० हजार रुपये
Sharad Pawar Inspire fellowship

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (Yashwantrao Chavan Centre) वतीने २० प्राथमिक शिक्षक (Primary Teachers) आणि १० माध्यमिक शिक्षकांना (Secondary Teachers) तर उरलेली १० ही एकात्मिक बी.एड. (Integrated B.Ed) करणाऱ्या विद्यार्थ्यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (Sharad Pawar inspire Fellowship) दिली जाणार आहे. फेलोशिपची रक्कम साठ हजार रुपये एवढी असेल. शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.

 

चालू शैक्षणिक वर्षात (२०२३ -२४ ) महाराष्ट्रातील २० प्राथमिक आणि २० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात आली. या फेलोशिप अंतर्गत भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविणे, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, कला व खेळ यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे आकलन वाढविणे, हा उद्देश आहे.

परीक्षा परिषदेची ढकलगाडी; शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज कधी भरायचे? आजचा मुहूर्तही हुकला

त्याचप्रमाणे वाचन आणि आकलन वाढवण्यासाठीचे उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे उपक्रम या वर्षीच्या फेलोशिप प्राप्त शिक्षकांनी निवडले आहेत, अशी माहिती सेंटरकडून देण्यात आली.

 

ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा  लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२४ -२५ च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२३ पासून झाली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२३ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन सेंटरकडून करण्यात आले आहे.

 

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. फेलोशिपच्या माध्यमातून अशा शिक्षणाचा आनंद विद्यार्थ्यांना घेता यावा, हाच उद्देश असल्याचे सेंटरकडून सांगण्यात आले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo