NEET MDS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू ; पण दुरुस्तीची संधी नाही

राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेची नोंदणी आज 9 मार्च पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 11 मार्च या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करता येतील.

NEET MDS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू ; पण दुरुस्तीची संधी नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरीसाठी (NEET-MDS 2024) साठी  National Eligibility-cum-Entrance Test ची नोंदणी (Entrance Test Registration) शनिवार  9 मार्च पासून सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 11 मार्चपर्यंत अर्ज (Apply by March 11) करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://natboard.edu.in ला भेट द्यावी लागेल आणि लॉग इन करावे लागेल. मात्र, यामध्ये दुरुस्तीची संधी उपलब्ध करुन (No chance of changes is available) दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांना अत्यंत काळजीपुर्वक अर्ज भरावा लागणार आहे. 

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने अलीकडेच जारी केलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी आता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही. म्हणून, उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा, जेणेकरून अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही.

प्रसिध्द केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, NEET MDS 2024 साठी पात्रतेच्या उद्देशाने इंटर्नशिप पूर्ण करण्याची शेवटची  तारीख 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय, 18 मार्च 2024 रोजी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतली जाईल.

परीक्षेची प्रवेशपत्रे 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केली जातील. हॉल तिकीट अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. उमेदवार आवश्यक तपशील टाकून पोर्टलवरून ते डाउनलोड करू शकतील.