पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी खास 'ॲप', थेट ऑनलाईन संवाद साधता येणार

पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेने (माय अल्युमनाय नेटवर्क) हे ॲप विकसित केले असून या ॲप च्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांशी सहजरीत्या संवाद साधता येणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी खास 'ॲप', थेट ऑनलाईन संवाद साधता येणार
SPPU Alumni Association

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) माजी विद्यार्थ्यांसाठी ॲल्युमनाय असोसिएशनच्या (SPPU Alumni Association) वतीने “माय अल्युमनाय नेटवर्क”  (My Alumni Network) या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Karbhari Kale) यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेने (माय अल्युमनाय नेटवर्क) हे ॲप विकसित केले असून या ॲप च्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांशी सहजरीत्या संवाद साधता येणार आहे. "माय अल्युमनाय नेटवर्क" या ॲप द्वारे माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमध्ये नाव नोंदवता येते. या ॲपच्या माध्यमातून  विद्यापीठाशी तुम्ही जोडले जाताच, शिवाय  नोकरीसाठी अर्ज करणेही शक्य होते.

हेही वाचा : केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट; विद्यार्थ्यांकडून संताप

आठवणी, जुने मित्र यांसाठी हे हक्काचे व्यासपीठ असेल. विद्यापीठातील शैक्षणिक चालू घडामोडीची माहिती याद्वारे मिळत राहील. या ॲप लॉन्चिंग कार्यक्रमास  प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, माजी विद्यार्थी संघाचे संचालक डॉ.संजय ढोले आदी यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाचे संपर्क अधिकारी प्रतीक दामा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2