ब्रिटनच्या व्हिसा बदलाचे भारतीय विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम ?

उच्च शिक्षित आणि विशेष कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 'ग्रॅज्युएट रूट व्हिसा' 

ब्रिटनच्या व्हिसा बदलाचे भारतीय विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये (Britain) कामासाठी, राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट रूट व्हिसाचे (Graduate Route Visa) पुनरावलोकन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उच्च शिक्षित आणि कुशल विद्यार्थी ज्याच्या सेवेमुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल, अशा विद्यार्थ्यांना  ब्रिटन मध्ये राहण्याची परवानगी मिळेल, असे संकेत ब्रिटनच्या स्थलांतराच्या नव्या स्वतंत्र अहवालात (In a new independent report on migration to Britain) देण्यात आले आहेत.मात्र, त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर सकारात्मक परिणाम होणार  की नमारात्मक ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेव्हरली यांनी गेल्या आठवड्यात संसदेत याविषयी माहिती दिली होती. यानंतर या विषयी चर्चेला सुरु झाली होती. जेम्स क्लेव्हरली यांनी सांगितले होते कि, "ग्रॅज्युएट रूट व्हिसाचा गैरवापर टाळण्यासाठी आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्याचे पुनरावलोकन केले जाईल." आता  इमिग्रेशन अॅडव्हायझरी कमिटी (MAC) कडून सांगण्यात आले आहे कि, ही समिती  गृह कार्यालयाकडून औपचारिक घोषणेची वाट पाहत आहे.  ग्रेट ब्रिटन मध्ये. ही समिती (MAC) यूके सरकारला त्यांच्या व्हिसा धोरणांबाबत सल्ला देते.

हेही वाचा : युजीसीचा इशारा : परदेशी विद्यापीठे, जाहिरातदारांना ऑनलाइन अभ्यासक्रमची जाहिरात पडणार महागात

ग्रॅज्युएट रूट व्हिसाच्या अंतर्गत, यूकेमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कामासाठी, राहण्यासाठी किंवा देशात कामासाठी अर्ज करू शकतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये दोन वर्षांपर्यंत राहण्यासाठी अर्ज करू शकतात. तर पीएचडी करणारे विद्यार्थी तीन वर्षे राहण्यासाठी अर्ज करू शकतात.
ग्रॅज्युएट रूट व्हिसा जुलै २०२१ मध्ये तत्कालीन गृहमंत्री प्रिती पटेल यांनी लागू केला होता. त्यामुळे, १ लाख, ७६ हजार  आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रसिध्द करण्यात आलेल्या ग्रॅज्युएट रूट व्हिसांपैकी ४२ टक्के भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे या श्रेणीतील कोणताही बदल भारतीय विद्यार्थ्यांवर लक्षणीय परिणाम करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.