केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट; विद्यार्थ्यांकडून संताप

परीक्षेच्या काही दिवस आधीच विद्यार्थ्यांना संबंधित शहरात परीक्षेसाठी वेळेवर पोहचता यावे, या उद्देशाने 'एनटीए'कडून  सिटी इंटीमेशन स्लीप प्रसिध्द केली जाते.

केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट; विद्यार्थ्यांकडून संताप
Central Universities in India

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (NTA) सामाईक प्रवेश परीक्षा (CUET UG 2023) २१ ते २८ मे यादरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र (Examination Centre) कोणत्या शहरात आहे, याची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही शहरांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याने परीक्षेचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता १ ते ६ जूनदरम्यानही घेण्यात येणार आहे. (City Intimation slip for CUET (UG) 2023)

'एनटीए'कडून देशभरात काही ठराविक शहरांमध्येच परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधीच विद्यार्थ्यांना संबंधित शहरात परीक्षेसाठी वेळेवर पोहचता यावे, या उद्देशाने एनटीएकडून सिटी इंटीमेशन स्लीप प्रसिध्द केली जाते. त्यामध्ये परीक्षेची तारखी, परीक्षेची वेळ, विषय आणि शहराचा उल्लेख असतो. विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शहरांची निवड करण्याचा आल्याचे 'एनटीए'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : पीएचडी, नेट नसतानाही प्राध्यापक; मंजूर पदांचे काय होणार? 'यूजीसी'चे नवे पोर्टल सुरू

प्रवेश परीक्षेसाठी काही ठराविक शहरांचे पर्याय अनेक विद्यार्थ्यांनी निवडले आहेत. अपेक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची अधिक नोंद झाल्याने संबंधित शहरांमध्ये परीक्षेचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता १ व २ जून आणि ५ व ६ जून यादिवशीही परीक्षा घेतली जाणार आहे. तर ७ व ८ जून असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.

सिटी इंटीमेशन स्लीप च्याआधारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळणार नाही. ही स्लीप केवळ परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे, याच्या माहितीसाठी आहे. परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठीचे प्रवेशपत्र नंतर दिले जाणार असल्याचेही एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या पर्यायांमधून शहर मिळालेले नसल्याची तक्रार सोशल मीडियातून केली आहे. काही विद्यार्थ्यांना ९०० किलोमीटर लांबचे शहर देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहचताना विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे. आर्थिक भुर्दंडासाठी बराच वेळ प्रवासात घालवावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2