विद्यार्थ्यांच्या समस्या वेशीला टांगलेल्या! 'अभाविप'चा गंभीर आरोप, परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यासाठी उपोषण

अकार्यक्षम परीक्षा संचालकांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या वेशीला टांगलेल्या! 'अभाविप'चा गंभीर आरोप, परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यासाठी उपोषण
ABVP Protest in SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर समस्या वेशीला टांगलेल्या आहेत, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे. याविरोधात 'अभाविप'ने वाचा फोडल्याचे सांगत अकार्यक्षम परीक्षा (Examination Director) संचालक याकरिता जबाबदार असल्याचा दावाही केला आहे. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (Savitribai Phule Pune University)

विद्यापीठाच्या इतिहासात १०६ दिवसांचा कालावधी पार करून चुकीच्या पद्धतीने निकाल लावण्यात आला. 'मेकॅनिकल इंजिनियरींग च्या चौथ्या वर्षाच्या डायनामिक ऑफ मशिनरी या विषयाच्या पेपर मध्ये ९ वा प्रश्न दोन वेळेस आला आणि शेवटच्या १५ मिनीटांत प्रत बदलली गेली. कॅम्प्युटर इंजिनियरिंगच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंग विषयाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील ७ प्रश्न विचारण्यात आले. परीक्षांच्या वेळापत्रकाचे पूर्व नियोजन नसल्यामुळे पुण्यातील पालखी दि. १२ व १३ जून आणि आषाढी एकादशी व बकरी ईद १९ जून या दिवशीच्या परीक्षा आयत्या वेळेस पुढे ढकलण्यात आल्या, असे अभाविपकडून सांगण्यात आले.

MPSC : आयोगाकडून काळ्या यादीत टाकलेल्या ८३ जणांची नावे जाहीर, वाचा सर्व विद्यार्थ्यांची नावे

अंतिम वर्षांचे निकाल न लागल्यामुळे फक्त पुणे विद्यापीठातील विद्यार्थी CET च्या प्रक्रियेत जाण्यापासून वंचित राहत आहेत. फोटोकॉपीला अर्ज केल्यानंतर एक महिन्यांनी फोटोकॉपी मिळाली आणि रिव्हॅल्यूएशनचे निकाल मागील दिवसांपासून प्रलंबीत आहेत. B.P.Ed च्या परीक्षा होण्याआधीच फोटोकॉपीची लिंक बंद झाली. अनेक कोर्स च्या विद्यार्थ्यांना अजून देखील फोटोकॉपी मिळाली नाही आणि फोटोकॉपी मिळण्याची प्रक्रिया देखील चालू नाही? रिव्हॅल्यूएशनचे निकाल लागण्याआधीच बॅकलॉग च्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे, असा दावाही अभाविपकडून करण्यात आला.

अनेक अभ्यासक्रमांचे फोटोकॉपी प्रक्रिया सुरु नसुन ती तात्काळ सुरू करावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अर्ज केला त्यांना देण्यात यावी. ४५ दिवस होऊनही पुनर्मुल्यांकनाचे निकाल अद्याप लागले नाहीत ते निकाल तात्काळ व योग्य पद्धतीने लावावे. ज्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देऊन आवश्यकता नसताना बॅकलॉगची परिक्षा देण्याची परिस्थिती निर्माण केली. अशा विद्यार्थ्यांची रक्कम परत करावी. मेकॅनिकल इंजिनियरींगच्या ४थ्या वर्षाच्या डायनॅमिक ऑफ मशिनरी या विषयातील चुकीच्या प्रश्नांचे पुर्ण गुण देण्यात यावे आणि कॅम्प्युटर इंजिनियरिंगच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंग विषयाच्या अभ्यास क्रमाच्या बाहेरील ७ प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे. सर्व अभ्यासक्रमांचे निकाल पुढील ४५ दिवसांच्या आत लावण्याची दक्षता घ्यावी, अशा प्रमुख मागण्या अभाविपने यावेळी मांडल्या आहेत.

इयत्ता अकरावीची दुसरी निवड यादी जाहीर; प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्वाच्या टीप्स

अभाविपने या समस्या सोडविण्यासाठी वारंवार विद्यापीठात निवेदने दिले, आंदोलनेही केली. परंतु कोणतीही सकारात्मक कृती विद्यापीठाने केली नाही. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराला जबाबदार असणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अकार्यक्षम परिक्षा संचालकांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीला घेऊन अभाविप पुणे महानगरातील विद्यार्थी कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2