येरवडा येथे नवीन ‘आयटीआय’; तुकड्या, पदांना मान्यता, नऊ व्यवसायांचे प्रशिक्षण मिळणार

पुणे शहराची वाढती लोकसंख्या व त्यामानाने पुणे शहरातील आयटीआयमधील उपलब्ध मंजूर प्रवेशक्षमता लक्षात घेता प्रवेशोच्छुक उमेदवारांना प्रवेश मिळत नाहीत.

येरवडा येथे नवीन ‘आयटीआय’; तुकड्या, पदांना मान्यता, नऊ व्यवसायांचे प्रशिक्षण मिळणार
ITI in Yerawada

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून येरवडा येथे नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) स्थापन करण्यासाठीचा अभ्यासक्रम व पदनिर्मिती तसेच त्याच्या खर्चाला मान्यता दिली आहे. येरवड्यातील (Yerawada) ‘आयटीआय’साठी २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी अभ्यासक्रम व पदनिर्मितीला मान्यता मिळाली आहे. पण नवीन आयटीआयमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण (Training) कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता नाही. (Industrial Training Institute in Yerawada)

येरवडा व नगररोड या क्षेत्रात रांजणगाव व चाकण येथे औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आहे. या ठिकाणी आशिया खंडातील नामांकित उद्योगक्षेत्र असून जगभरातील अनेक प्रसिध्द कंपन्यांचे प्रकल्प या परिसरात आहेत. पुणे शहराची वाढती लोकसंख्या व त्यामानाने पुणे शहरातील आयटीआयमधील उपलब्ध मंजूर प्रवेशक्षमता लक्षात घेता प्रवेशोच्छुक उमेदवारांना प्रवेश मिळत नाहीत. त्यानुसार येरवडा येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा तसेच मागणी विचारात घेऊन नवीन आयटीआय सुरु करण्यात येणार आहे.

हेही वाचा : अकरावी प्रवेशाला सुरूवात; प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरा या तारखेपासून

नवीन आयटीआय सुरु करण्यासाठी १८ व्यवसाय तुकडया व त्यासाठी आवश्यक २३ शिक्षकीय, ८ शिक्षकेतर व ९ चतुर्थश्रेणी/ पहारेकरी/सफाईगार हे बाह्ययंत्रणेव्दारे उपलब्ध करुन घ्यावयाचे मनुष्यबळ अशा एकूण ४० पदांना बुधवारी मान्यता देण्यात आली. नवीन संस्थेची निर्मिती व त्याकरीता लागणाऱ्या एकूण ४० शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना तसेच यंत्रसामुग्री, हत्यारे साठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपये तर ४० शिक्षक व शिक्षकेतर पदांचे वेतन व इतर खर्चासाठी दरवर्षी २ कोटी २५ लाख ६३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, नवीन आयटीआयमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इल्कट्रॉनिक्स मेकॅनिक, टुल ॲण्ड डायमेकर (डाईज ॲण्ड मोल्ड), मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटींग, फिटर, इलेक्ट्रीशयन आणि वेल्डर या आठ व्यवसायांच्या प्रत्येकी दोन तुकड्या असतील. कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इल्कट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायांची प्रत्येकी एक तुकडी महिलांसाठी राखीव असेल. तसेच दोन्ही व्यवसायांची प्रवेशक्षमता प्रत्येकी ४८ तर इतर व्यवसायांसाठी ४० असेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2