Engineering Admission : अभियांत्रिकी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द; आजपासून भरता येणार पसंतीक्रम

गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांचे ऑनलाइन सबमिशन आणि पडताळणी २० जुलै ते २२ जुलै  या कालावधीत करता येणार आहे.

Engineering Admission : अभियांत्रिकी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द; आजपासून भरता येणार पसंतीक्रम
Engineering Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

MHT CET 2023 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT CET) B.Tech ची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. ही गुणवत्ता यादी शैक्षणिक सत्र २०२३- २०२४ साठी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि मास्टर ऑफ इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान या चार वर्षांच्या पदवी आणि १ वर्षाच्या पदव्युत्तर पदवी तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Engineering Admission News)

विद्यार्थी MAHACET च्या  fe2023.mahacet.org या अधिकृत साइटवरून गुणवत्ता यादी तपासू शकतात. MHT CET सेल ने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांचे ऑनलाइन सबमिशन आणि पडताळणी २० जुलै ते २२ जुलै  या कालावधीत करता येणार आहे.

‘महाज्योती’च्या परीक्षेतही गैरप्रकार; उमेदवारांच्या तक्रारींनंतर चौकशी सुरू

CAP च्या पहिल्या फेरीतील जागावाटप २५ जुलै रोजी जाहीर होणार आहे. यासंदर्भात अधिक तपशिलांसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

अशी पहा गुणवत्ता यादी -

* सर्वप्रथम उमेदवारांना MAHACET fe2023.mahacet.org या अधिकृत साइटला भेट द्यावी

*  त्यानंतर, होम पेजवर उपलब्ध MHT CET 2023 फायनल मेरिट लिस्ट-ऑल इंडिया, महाराष्ट्र, J&K लिंकवर क्लिक करा.

* एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे तपशील तपासू शकतात.

* आता पेज डाउनलोड करून प्रिंट आउट घ्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD