प्राध्यापक भरतीसाठी आजपासून बेमुदत सत्याग्रह; पुण्यात उच्च शिक्षण कार्यालयासमोर आंदोलन

अकृषी विद्यापीठे यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या मंजूर पदांच्या ८० टक्के भरती करण्यास ७ ऑगस्ट २०२९ व १६ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयांनी मंजुरी दिली आहे.

प्राध्यापक भरतीसाठी आजपासून बेमुदत सत्याग्रह;  पुण्यात उच्च शिक्षण कार्यालयासमोर आंदोलन
Protest for Professor Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

प्राध्यापक भरतीसह (Professor Recruitment) विविध मागण्यांसाठी नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारपासून (दि. २०) सत्याग्रह व बेमुदत धरणे आंदोलन (Protest) सुरू करण्यात आले आहे. पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या (Higher Education Department) कार्यालयाबाहेर सुरू झालेल्या या आंदोलनात समितीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

समितीचे राज्य समन्वयक डॉ. परमेश्वर पौळ यांनी ही माहिती दिली. राज्यातील सहाय्यक प्राध्यापक भरती २०२१ पासून आर्थिक व आरक्षण धोरणांमुळे संथ गतीने सुरु  होती. शासन निर्णय दि. ०३ नोव्हेंबर २०१९ मुळे प्राध्यापक भरतीला गती मिळाली. सन २०१७ मध्ये अशासकीय अनुदानित महाविद्यालये यामध्ये सहायक प्राध्यापकांची ३१ हजार १८५ पदे मंजूर, यातील  ८ हजार ९४९ पदे रिक्त होती. २०१७ च्या रिक्त पदांच्या ४० टक्के तसेच ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक यांची १०० टक्के भरती सुरु करण्यात आली आहे. तरीही अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील आज या रिक्त पदांची  संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे, असे पौळ यांनी सांगितले.

‘महाज्योती’च्या परीक्षेतही गैरप्रकार; उमेदवारांच्या तक्रारींनंतर चौकशी सुरू

अकृषी विद्यापीठे यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या मंजूर पदांच्या ८० टक्के भरती करण्यास ७ ऑगस्ट २०२९ व १६ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयांनी मंजुरी दिली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये २ हजार ५३४ पदे मंजूर, यातील १ हजार १६६ पदे आजही रिक्त आहेत. सशक्त भारत व विश्वगुरु बनवण्यासाठी गुरूंची म्हणजेच प्राध्यापकांची नेमणूक होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी देखील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, असे पौळ म्हणाले.

शासनाकडून यासंदर्भात कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रह व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य समन्वयक डॉ. परमेश्वर पौळ यांनी दिली.

विद्यार्थी, शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया घ्या! स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेचे विद्यापीठाला पत्र  

समितीच्या प्रमुख मागण्या -

  1. शंभर टक्के प्राध्यापक भरती.
  2. तासिका तत्त्वाचे धोरण बंद करून समान कामाला समान वेतन.
  3. सुरू असलेली महाविद्यालय व अकृषी विद्यापीठ मधील प्राध्यापक भरती गतिमान करणे.
  4. विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापकांचे नियुक्ती करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD