Maharashtra SET result 2023 : केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र, पाहा विषय आणि प्रवर्गनिहाय कटऑफ?

परीक्षेला ५१ हजार ५१२ मुले तर ६८ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी अनुक्रमे ४३ हजार ५१७ व ५७ हजार ७२३ जणांनी परीक्षा दिली.

Maharashtra SET result 2023 : केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र, पाहा विषय आणि प्रवर्गनिहाय कटऑफ?
Maharashtra SET Result 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत (Savitribai Phule Pune University) महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदाच्या पात्रतेसाठी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा (SET Result 2023) निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी एकूण एक लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ६७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

परीक्षेला ५१ हजार ५१२ मुले तर ६८ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी अनुक्रमे ४३ हजार ५१७ व ५७ हजार ७२३ जणांनी परीक्षा दिली. यामध्ये अनुक्रमे ८.२० टक्के मुले तर ५.३८ टक्के मुली पात्र ठरण्यात यशस्वी झाल्या. त्यामुळे सेट परीक्षेत मुलांनी मुलींना मागे टाकल्याचे दिसते.

Talathi Bharti 2023 : दिव्यांग आयुक्तालयाने मागविला खुलासा; अर्धन्यायिक प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा

त्याचप्रमाणे राज्यात १७ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.. त्यातील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर ३७२ दिव्यांग आणि ६८ अनाथ विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे ३३७ व ६० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली.

दरम्यान, खुल्या प्रवर्गाचा सर्वाधिक ६६.६७ टक्के कटऑफ उर्दू विषयाचा आहे. तर सर्वात कमी ४७.३३ टक्के कटऑफ मराठी विषयाचा आहे. मराठी विषयाची परीक्षा ६ हजार २३२ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी केवळ ३५५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर उर्दू विषयाची परीक्षा दिलेल्या ३४३ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी पात्र ठरले.

इथे पाहा कटऑफ : https://setexam.unipune.ac.in/SET_2022/Result/CutOff_Percentage_March2023.pdf

 

असा पहा निकाल

  • निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
  • संकेतस्थळावर परीक्षेचा दिनांक म्हणजे २६ मार्च २०२३ निवडा.
  • परीक्षेचा निकाल गुणांसह किंवा गुणांशिवाय पाहायचा असल्यास त्यानुसार पर्याय निवडा
  • परीक्षेचा क्रमांक टाका
  • विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सर्च रिझल्टवर क्लिक करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2