वाबळेवाडी शाळा चौकशीच्या फेऱ्यात? आमदार पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचे आश्वासन

वाबळेवाडीतील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा बनविणारे दत्तात्रय वारे (Dattatray ware) गुरूजी सध्या आंबेगाव तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे.

वाबळेवाडी शाळा चौकशीच्या फेऱ्यात? आमदार पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचे आश्वासन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेची आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा (Wablewadi ZP School) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अडीच वर्षांपुर्वी या शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे (Dattatray Ware) यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत जिल्हा परिषद (ZP)  प्रशासनाने त्यांना निलंबित केले होते. आता पुन्हा एकदा आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी या शाळेतील गैरप्रकाराची चौकशी कालबध्दपणे करण्याची मागणी गुरूवारी थेट विधानसभेत (Maharashtra Assembly) केली.

वाबळेवाडीतील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा बनविणारे दत्तात्रय वारे (Dattatray ware) गुरूजी सध्या आंबेगाव तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. काही महिन्यांतच त्यांनी ही शाळाही वाबळेवाडीसारखीच उभी केली. वाबळेवाडी शाळेत असताना अडीच वर्षांपुर्वी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. 

'ईडी' करणार नाशिकमधील शिक्षण अधिकाऱ्याची चौकशी; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

स्थानिक मुलांना प्रवेश नाकारला जातो, डोनेशन घेऊन बाहेरील मुलांना प्रवेश दिला जातो, देणग्यांमध्ये अनियमितता असे आरोप वारे गुरुजींवर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे निलंबन करून चौकशी समितीही बसविण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याची जोरदार चर्चाही त्यावेळी जिल्ह्याच्या शिक्षण वर्तूलात सुरू होती.

त्यानंतर आता आमदार अशोक पवार यांनी गुरूवारी गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला. वाबळेवाडी शाळेतील गैरप्रकार दोन-अडीच वर्षांपुर्वी झाला, त्याची चौकशी कालबध्द पध्दतीने करण्याची मागणी पवार यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकेकाळी वाबळेवाडी शाळा ही जिल्हा परिषदेची आयडीयल शाळा म्हणून नावाजली होती. मी तिथे जाऊन आलो आहे. अनेक पुरस्कार मिळाले होते. डिजिटायझेशन झाले होते. डिजिटल क्लासरुम झाल्या होत्या. नवीन उपक्रम सुरू झाले होते. जिल्हा परिषदेची शाळाही अशी असू शकते, याची चर्चा झाली होती. या शाळेबाबत काही तक्रारी झाल्या असतील तर कालबध्द चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD