शालेय साहित्य खरेदी करताना पालक बेजार; आठवीपेक्षा सहावी-सातवीची पुस्तके महाग 

विविध इयत्तेतील पुस्तकांच्या किंमतीनुसार इयत्ता दुसरीच्या पुस्तकांची किंमत सर्वात कमी म्हणजेच २७७ इतकी आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची किंमत २८५ इतकी आहे.

शालेय साहित्य खरेदी करताना पालक बेजार; आठवीपेक्षा सहावी-सातवीची पुस्तके महाग 
School Material Price Hike

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष सुरु व्हायला आता दोनच दिवस उरल्याने सध्या पुस्तके (School TextBooks) आणि शाळांचे गणवेश (School Uniforms) तसेच इतर शालेय  वस्तू घ्यायला पालकांची (Parents) दुकानाबाहेर गर्दी दिसू लागली आहे. पण या गडबडीत शालेय खर्चाकडे बघून पालकही काहीसे त्रासलेले दिसत आहेत. यंदा पुस्तकांचे दरही वाढले आहेत. विशेष म्हणजे यंदा ८ वी पेक्षा ६ वी आणि ७ वी ची पुस्तके अधिक महाग असल्याचे दिसत आहे. (Cost of School Matrials)

इयत्ता ८ वी  च्या पार्ट १, पार्ट २, पार्ट ३ आणि पार्ट ४ अशा चारही भागांच्या पुस्तकांची एकूण किंमत ५६० रुपये आहे. तर ६ वी च्या चारही भागांच्या पुस्तकांची किंमत ५७६ आणि ७ वीच्या चारही भागांच्या पुस्तकांची एकूण किंमत ५९४ इतकी आहे. ८ वी च्या पुस्तकांची किंमत कमी आणि ६ वी, ७ वी च्या पुस्तकांची किंमत अधिक असल्यामुळे सध्या पालकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी भरला पहिला भाग

विविध इयत्तेतील पुस्तकांच्या किमतीनुसार इयत्ता दुसरीच्या पुस्तकांची किंमत सर्वात कमी म्हणजेच २७७ इतकी आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची किंमत २८५ इतकी आहे. इयत्ता ३ री चे चारही भाग ५१४ रुपयांत, ४ थी ची पुस्तके ५५१ रुपयांत आणि ५ वी च्या पुस्तके ५५४ रुपयांत मिळत आहेत. पुस्तकांच्या या किमतींमुळे पालक मात्र चक्रावून गेले आहेत. 

पुस्तकांच्या किंमती बद्दल ‘एज्युवार्ता’शी बोलताना माधवी नायडू म्हणाल्या, "माझी दोन्ही मुले खडकी येथील एस.व्ही.एस. शाळेत शिकत आहेत. मुलगी रिचा ६ वी मध्ये आहे तर मुलगा रियांश ८ वी मध्ये आहे. लॉजिकली पाहता मोठ्या वर्गाच्या पुस्तकांचा खर्च जास्त हवा पण ८ वी च्या पुस्तकांची किंमत साडेपाचशे पर्यंत आहे. तर ६ वी च्या पुस्तकांची किंमत ६५० च्या पुढे आहे. याशिवाय फी, गणवेश आदींचा खर्च आहेच. पुस्तकांच्या किंमतीच्या फरकांविषयी शिक्षकांकडे चौकशी केली असता ६ वी साठी 'स्टोरी मॅगजीन', 'जनरल नॉलेज' या विषयांवरची जास्तीची पुस्तके असल्याचे सांगण्यात आले.

RTE Admission : थकलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची केंद्रीय सचिवच करणार राज्यातील अधिकाऱ्यांना विचारणा

मंगेश भोसले म्हणाले, "माझा मुलगा कौस्तुभ दापोडी येथील 'डिव्हाईन इंग्लिश मिडीयम स्कुल' मध्ये ६ वी मध्ये शिकत आहे. यावर्षी फक्त वही पुस्तके आणि कलर्स एवढ्या साहित्यासाठी शाळेने सुमारे १२०० रुपये घेतले आहेत. याव्यतिरिक्त गणवेश, शाळेची फी, शाळेत येण्याजाण्याचा  खर्च असा सर्व खर्च मिळून वर्षाला ७० हजार रुपयांपर्यंत होतात. मध्यमवर्गीय कुटुंबाला एवढा खर्च करण्यासाठी खूप काटकसर करावी लागते. पण मुलाला चांगले शिक्षण द्यायचे असेल तर पर्यायही राहत नाही." 

पंकज ढवळे यांनी सांगितले की, "माझी दोन्ही मुले औंध येथील 'स्पाइसर' शाळेत शिकत आहेत.   त्यांची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध होत नाहीत, ती आम्हाला शाळेतूनच घ्यावी लागतात. दोघांचा फक्त पुस्तकांचा खर्च ७ हजारांच्या घरात जातो. आम्ही शाळेत शिकत असताना आमचा एकूण वार्षिक खर्च सुद्धा एवढा होत नव्हता. खाजगी शाळांची फी, पुस्तकाचा खर्च आदींवर शासनाचा निर्बंध असेल असे दरवर्षी ऐकतो पण प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo