मणिपूरमध्ये अडकलेले २५ जण परतले; ही आहेत विद्यार्थ्यांची नावे...

सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांना इंफाळहून गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. तिथून रात्री उशिरा विशेष विमानाने सर्व विद्यार्थी मुंबईत दाखल झाले.

मणिपूरमध्ये अडकलेले २५ जण परतले; ही आहेत विद्यार्थ्यांची नावे...
Students return in Mumbai from Manipur

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) २५ विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांना (Students) इंफाळहून गुवाहाटी (Guwahati) येथे विशेष विमानाने आणण्यात आले. तिथून रात्री उशिरा विशेष विमानाने सर्व विद्यार्थी मुंबईत दाखल झाले.

राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, राजशिष्टाचार अधिकारी अब्दुल अजीज बेग आणि त्यांच्या टीमने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सुखरूप परतल्याबद्दल विद्यार्थ्यांनीदेखील राज्य शासनाचे आभार मानले. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी (Manipur NIT), आयआयटीमध्ये (Manipur IIT) शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा : कुलगुरू पदासाठी राजकीय वरदहस्त कशाला ?

काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अडकले असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. याचबरोबरच मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने आसाममार्गे महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सोमवारी रात्री हे विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांची नावे : आदित्य गजभिये, तुषार आव्हाड, आयुष दुबे, शिवसंपत तागिरीसा, गौतम चौरसिया, साजन पौणिकर, मोहित खडपे, भूषण पावरा, वृक्षाल गणवीर, विकास शर्मा, तन्मय मादव, मडिकोंडा अविनाश, रोहित कोरी, आयुष रवी, ज्ञानदीप छुटे, प्रतिक कोडग, पुनर्वसू इंगोले, साईजित निकम, अनन्य बॅनर्जी, शंतनू कुंभीरकर, क्रिश कलगुडे, फाल्गुन महाजन, मधुरिका इंदूरकर, रोनिल नाडर आणि अश्वगंधा पराडे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2