अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये 'एनईपी' वर कार्यशाळा 

annasaheb magar college, pune, university,nep,

अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये 'एनईपी' वर कार्यशाळा 

              पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे आणि नियोजन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाच्या सहकार्याने अण्णासाहेब मगर महाविद्यालयात  १० व ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत 'Implementation of National Education Policy-2020 Industry-Institute Linkage' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.      

         विद्यार्थ्यांना कौशल्यआधारित ज्ञान प्रदान करणे आणि उद्योगांमध्ये अलीकडच्या काळात अवलंबलेल्या नवीन साधनांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील परस्परसंवादामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी सांघिक कार्याची भावना विद्यार्थी, शिक्षक व उद्योजकांमध्ये निर्माण होते. सदर कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी, प्राध्यापक व उद्योगांसाठी करण्यात आलेले आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील दरी कमी करण्यासाठी कार्यशाळेची मदत होऊन सामंजस्य कराराची स्थापना होऊन कॅम्पस प्लेसमेंटचा दर वाढण्यास मदत होण्याच्या उद्देशाने ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
            सदर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ॲडव्होकेट मा. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मुंबई येथील मा. डॉ.अपूर्वा पालकर  "Implementation  of New Educational Policy 2020 - Industry Institute Linkage" या विषयावर बीजभाषण करणार आहेत. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात गोवा येथील दामोदर महाविद्यालयातून डॉ. अंजली साजीलाल या "Impact of Industry-Institute Linkage on skills set of Students" या विषयावर बोलणार आहेत.
कार्यशाळेच्या तृतीय सत्रात बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. पुराणिक हे "Imp lementation of New Educational Policy Indutry Institute Linkages" या विषयावर बोलणार आहेत. कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव  चे माजी कुलगुरू डॉ. आर.एस.माळी ""Implementation of New Educational Policy Indutry Institute Linkages" या विषयावर बीजभाषण करणार आहेत.
               कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार हे "Reading Prospective Plan with Industrial Linkage under NEP" या विषयावर बोलणार आहेत. दुसऱ्या सत्रात डॉ. नितीन करमळकर,  महाराष्ट्राचा NEP च्या अंमलबजावणीसाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे प्राध्यापक "Implementation of New Educational Policy Indutry Institute Linkages" या विषयावर बोलणार आहेत.
             कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच कार्यशाळेच्या नियोजनात उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप, वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख व उपप्राचार्या डॉ. शुभांगी औटी, डॉ. राजेश रसाळ, डॉ. नीता कांबळे, कार्यालय अधिक्षक श्री.धनंजय बागडे आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ यांचा समावेश आहे.