केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाची प्रतीक्षा संपली 

केंद्रीय विद्यालय संघटनच्या (kendriya vidyalaya sangathan) वतीने इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी येत्या २७ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाची प्रतीक्षा संपली 

आपल्या पाल्याला केंद्रीय विद्यालयात प्रवेश  (kendriya vidyalaya admission) मिळावा, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय विद्यालय संघटनच्या (kendriya vidyalaya sangathan) वतीने इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या प्रवेशाचे वेळापत्रक https://kvsangathan.nic.in/hi या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी येत्या २७ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तर इयत्ता दुसरी ते दहावी पर्यंतच्या प्रवेशासाठी ३ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.रिक्त राहिलेल्या जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, केंद्रीय विद्यालय संघटनने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना एकसमान शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय विद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांवर इतरही वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणेच केंद्रीय विद्यालयांमध्ये सुद्धा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. इयत्ता पहिलीसाठी प्रवेश अर्ज करणास २७ मार्च ते १७ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी २० एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबविल्या जाणार आहेत.

केंद्रीय विद्यालयाच्या सूचना फलकावर तसेच शाळेच्या संकेतस्थळावर प्रवेश याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. वीस दिवसांच्या आत इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.