EduVarta Impact : बालभारतीच्या डोमेन विक्रीचा मुद्दा थेट विधानसभेत, वर्षा गायकवाड आक्रमक

विधानसभेत बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे.

EduVarta Impact : बालभारतीच्या डोमेन विक्रीचा मुद्दा थेट विधानसभेत, वर्षा गायकवाड आक्रमक
Balbharati News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Balbharati News : बालभारतीचे डोमेन विक्रीला निघाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ‘एज्युवार्ता’ने उघडकीस आणल्यानंतर शिक्षण विभागाला (Education Department) खडबडून जाग आली. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) तक्रार देण्यात आली आहे. बुधवारी हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पोहचला. माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली. (Maharashtra Monsoon Assembly Session)

विधानसभेत बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बालभारतीचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर्समध्ये विकणे आहे, अशी जाहिरात गूगलवर झळकली आहे. या जाहिरातीमुळे शालेय शिक्षण विभागात सध्या सुरू असलेला सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Balbharati News : पाच महिन्यांपूर्वीच झाले हॅकिंग, बालभारतीच्या तक्रारीतून धक्कादायक माहिती समोर

या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया फेब्रुवारी २०२३ मध्ये केली असताना असा गंभीर प्रकार कसा काय घडू शकतो? हा फसवणुकीचा किंवा हॅकिंगचा प्रकार आहे का? याबाबत शासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी गायकवाड यांनी विधानसभेत केली. त्यामुळे आता हा संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी केली जाऊ शकते.

दरम्यान, बालभारतीच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी योगेश लिमये यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बालभारतीचे balbharati.in हे संकेतस्थळ असून त्यातच नावाने डोमेन आहे. त्याची २००५ मध्येच नोंदणी केलेली आहे. बालभारतीकडून रिसेलर क्लबकडून डोमेनचे नियमितपणे ऑनलाईन नुतणीकरण केले जाते. नुकतेच १६ फेब्रुवारी रोजी पाच वर्षांसाठी नुतणीकरण केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

'balbharati.in’ विकणे आहे! शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, ‘डोमेन’ विक्रीची जाहिरात

अचानक १३ जुलै २०२३ रोजी बालभारतीचे डोमेन नेमचिप.कॉम या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच याबाबत खुलाशासाठी या संकेतस्थळाकडे खुलासा मागण्यात आला. त्यांनी रिसेलर क्लबकडून माहिती घेण्यास सांगितल्यानंतर हे डोमेन २१ फेब्रुवारी २०२३ रोजीच शिफ्ट झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी पब्लिक डोमेन रजिस्ट्रीकडे तक्रार करण्यास सांगितले. तिथून त्यांनी edp_manager@balbharati.in याद्वारे नुतणीकरणासाठी प्रय़त्न झाल्याचे सांगितले. पण बालभारतीकडून याचा कधीच वापर केला जात नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ‘Admin User’ हॅक झाल्याची तक्रार असल्याचे लिमये यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD