आता मदरशांमध्येही संस्कृतचे धडे; NCERT चा अभ्यासक्रम लागू होणार

एक मुस्लिम मुलगी रजिया सुलताना हिने संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. ती संस्कृतमध्ये कुराण अनुवादित करत आहे.

आता मदरशांमध्येही संस्कृतचे धडे; NCERT चा अभ्यासक्रम लागू होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

धार्मिक शिक्षण देणे हा महत्वाचा उद्देश असणाऱ्या मदरशांमध्ये (Madarsa) आता मुलांच्या भविष्याचा विचार करून आधुनिक शिक्षणही (Modern Education) दिले जात आहे. यापार्श्वभूमीवर आता उत्तराखंडमधील (Uttarakhand) मदरशांनी पुढचे पाऊल उचलत संस्कृत (Sanskrit Language) विषय शिकवण्याचे ठरवले आहे.

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी याबद्दल माहिती दिली. शादाब शम्स म्हणाले, "उत्तराखंड देवभूमी आहे. इथे संस्कृत शिकविले जाणार नाही तर मग कुठे शिकविले जाणार. आता मुस्लिम समाजातील लोकांनाही बदल हवा आहे. त्यांनाही मदरशांच्या आधुनिकीकरणामुळे आनंद होत आहे.

बी.एड. प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू; चार फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

 

एक मुस्लिम मुलगी रजिया सुलताना हिने संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. ती संस्कृतमध्ये कुराण अनुवादित करत आहे. संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा मदरसा शिक्षण समितीमध्येही समावेश करण्यात आला आहे. राज्यातील मदरशांमध्ये एनसीईआरटी अंतर्गत विषय शिकवले जातील. मदरशांमध्ये मुस्लिम विद्यार्थी संस्कृत, हिंदी, अरबी किंवा इतर भाषांमधून विषय निवडू शकतील.

 

"बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांचे आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचे शम्स यांनी सांगितले. यामध्ये स्मार्ट क्लासेस आणि आधुनिक शिक्षणासोबतच मुलांना टॅबलेट आणि कॉम्प्युटरही दिले जाणार आहेत. याच क्रमाने उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांतील चार मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण सुरू केले जात आहे.  यासाठी शासनासह वक्फ बोर्ड सातत्याने प्रयत्न करत आहे." 

 

दरम्यान वक्फ बोर्डाकडून सुरुवातीला राज्यातील चार जिल्ह्यांतील चार मदरशांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहेत.  याअंतर्गत वक्फ बोर्डाने 'एका हातात लॅपटॉप, एका हातात कुराण' असा नारा दिला होता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j