मणिपूरमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या; फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश

राज्यातील जातीय हिंसाचाराच्या काळात ६ जुलै रोजी या दोन विद्यार्थ्यांचे अपहरण झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे मणिपूरची राजधानी इंफाळचे वातावरण पुन्हा तापले आहे.

मणिपूरमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या; फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

जवळपास पाच महिन्यांच्या बंदीनंतर मणिपूरमध्ये (Manipur) जनजीवन सुरळीत होत आले असताना इंटरनेट पूर्ववत झाल्यानंतर दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची (Students Murder) छायाचित्रे सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाली आहेत. त्यामुळे मणिपूरमधील वातावरण पुन्हा तापले आहे. मंगळवारी इंफाळमध्ये (Imphal) शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला.

 

सध्या मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये  एक १७ वर्षांची मुलगी आणि त्याच वयाचा एक मुलगा एका सशस्त्र गटाच्या तात्पुरत्या जंगल कॅम्पच्या गवताळ कंपाऊंडमध्ये बसलेले आहेत.  त्यांच्या मागे दोन बंदूकधारी पुरुष स्पष्टपणे दिसत आहेत.

पदवीधर प्राथमिक शिक्षकांना लॉटरी; पदोन्नतीनंतर वेतन निश्चितीबाबत मोठा निर्णय

 

पुढील फोटोमध्ये त्यांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. राज्यातील जातीय हिंसाचाराच्या काळात ६ जुलै रोजी या दोन विद्यार्थ्यांचे अपहरण झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे मणिपूरची राजधानी इंफाळचे वातावरण पुन्हा तापले आहे. आज इंफाळमध्ये आज शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

 

विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. यावेळी  विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या निवासस्थानाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुर आणि स्मोक बॉम्बचा वापर केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j