राज्यात एक सप्टेंबरपासून आठ दिवस होणार साक्षरता जागर

देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यास अनुसरून केंद्र ‘शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यांमध्ये केंद्र पुरस्कृत ‘उल्लास-नव भारत साक्षरता’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

राज्यात एक सप्टेंबरपासून आठ दिवस होणार साक्षरता जागर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरात येत्या १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह (Literacy Week) राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये साक्षरतेविषयी जनजागृती (Literacy Awareness) करण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, महिला तसेच सामाजिक संस्थांच्या बैठका, सायकल, दुचाकी फेरी, प्रभात फेरी, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन असे उपक्रम असतील. (Education Department News)

देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यास अनुसरून केंद्र ‘शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यांमध्ये केंद्र पुरस्कृत ‘उल्लास-नव भारत साक्षरता’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याचअनुषंगाने दि. ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनानिमित्त देशात दि. १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Shailaja Darade : शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळला

साक्षरता सप्ताहादरम्यान उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी व उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम मोबाईल अप वर स्व-नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सुचना राज्याचे शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, मनपा व नगरपालिकांचे प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

साक्षरता सप्ताहादरम्यान जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड, गाव, शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमही आयोजित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये ‘उल्लास’ विषयी कार्यशाळा, चर्चासत्र, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, महिला तसेच सामाजिक संस्थांच्या बैठका, सायकल, दुचाकी फेरी, प्रभात फेरी, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, पत्रकांचे वाटप, सर्वांना शिक्षण विषयावर परिसंवाद, लुघपट असे विविध उपक्रम सुचविण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून याबाबत सर्व राज्यांना कळविण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo