पोलीस उपायुक्तांसह दामिनी पथकासोबत चिमुकल्यांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

डी. ई. एस. पूर्व प्राथमिक शाळेने रक्षाबंधन सणानिमित्त शहराचे पोलीस उपायुक्त संदीप गिल आणि दामिनी पथकाच्या प्रमुख अनिता  मोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस महिलांना राखी बांधून सण साजरा केला.

पोलीस उपायुक्तांसह दामिनी पथकासोबत चिमुकल्यांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुलांनो तुम्ही भावी नागरिक होणार आहात. हे वय तुमचं खूप खेळायचं आहे, मात्र त्याबरोबरच तुम्ही चांगला आहार, व्यायाम करून अभ्याससुद्धा करा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करताना देशाचे उत्तम नागरिक व्हावा असा सल्ला देत पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल (Sandeep Gill) यांनी डी. ई. एस. मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेतील (DES School) बालगोपाळांशी संवाद साधला. निमित्त होतं, अनोख्या रक्षाबंधन (Rakshabandhan) सणाचे.

सामाजिक बांधिलकी जपत डी. ई. एस. पूर्व प्राथमिक शाळेने रक्षाबंधन सणानिमित्त शहराचे पोलीस उपायुक्त संदीप गिल आणि दामिनी पथकाच्या प्रमुख अनिता  मोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस महिलांना राखी बांधून सण साजरा केला. रक्षाबंधन यादिवशी पोलीस प्रशासनावर असलेला कामाचा भार लक्षात घेऊन नुकतीच अनोखी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली.

'रक्षाबंधन' निमित्ताने शाळांनी जोडला सामाजिक बांधिलकीचा धागा

शाळेतल्या मोठ्या गटाच्या विदयार्थ्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधली. नागरिकांना संरक्षण देणाऱ्या पोलीस खात्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, डेक्कन एज्यूकेशन संस्थेचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, शाळा समितीच्या अध्यक्ष राजश्री ठकार उपस्थित होते.

गिल म्हणाले, मी अगोदर शिक्षक होतो. मी खूप मेहनत केली. तशीच तुम्हीपण करा. खूप शिका, मोठे व्हा, देशाचे उत्तम नागरिक व्हा. लहान मुलांना घडवणे ही सोपी गोष्ट नाही असे सांगून, त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. चांगल्या गोष्टी, चांगले वागणे कसे असले पाहिजे हे मुलांना मनमोकळ्या गप्पामधून त्यांनी सांगितले. यावेळी मुलांना गुड टच आणि बॅड टच, अनोळखी व्यक्तीपासून सावध कसे राहायचे यांचे प्रात्यक्षिक दामिनी पथकाने दाखविले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo