कुलगुरू पदासाठी विद्यापीठातीलच १२ जणांमध्ये चुरस ; मुलाखतीचा कार्यक्रम ठरला

येत्या 18 व 19 मे रोजी या उमेदवारांच्या मुलाखती आयआयटी मुंबई  येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे मे महिना अखेरपर्यंत विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, विद्यापीठातील तब्बल १२ उमेदरावर कुलगुरू पदासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.                                            

कुलगुरू पदासाठी विद्यापीठातीलच  १२ जणांमध्ये चुरस ;  मुलाखतीचा कार्यक्रम ठरला

    एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

                
     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (sppu) कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्या 27 उमेदवारांची यादी कुलगुरू शोध समितीने प्रसिद्ध केले असून येत्या 18 व 19 मे रोजी या उमेदवारांच्या मुलाखती आयआयटी मुंबई Iit bomby येथे घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे मे महिना अखेरपर्यंत  पुणेविद्यापीठाला vice chancellor of Pune university नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, विद्यापीठातील तब्बल १२ उमेदरावर कुलगुरू पदासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.                                        
   
    पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या निवृत्तीनंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी डॉ.कारभारी काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.तर प्र कुलगुरू पदी डॉ.संजीव सोनवणे यांची निवड केली गेली.सुमारे वर्षभरापासून दोघेही विद्यापीठाचा कारभार पाहत आहेत.परंतु,आता विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. विद्यापीठातील अधिष्ठातांसह विविध विभागातील प्रमुखांनी व प्राध्यापकांनी  कुलगुरू पदासाठी अर्ज केला आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ विद्यापीठातीलच व्यक्तीच्या गळ्यात पडते की विद्यापीठाबाहेरील व्यक्तीची निवड कुलगुरू म्हणून होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.     

MBA ची नुसती डिग्री उपयोगाची नाही; त्यानंतर काय करावे? विद्यापीठाच्या अधिष्ठातांनी सांगितले पर्याय...
    
    कुलगुरू निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या शोध समितीने जाहीर केलेल्या यादीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर ,मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे यांच्यासह माजी अधिष्ठाता अंजली कुरणे, विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.अशोक चव्हाण, रसायनशास्त्र विभागाचे प्रा.अविनाश कुंभार ,भौतिकशास्त्र विभागाचे प्रा.संदेश जाडकर भौतिकशास्त्र विभागातील प्रा.संजय ढोले,पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा.सुरेश गोसावी ,गणित विभागाचे विलास खरात,बायोटेक्नॉलॉजी विभागाचे राजू गच्छे यांचा समावेश आहे.                                               

     पुणे विद्यापीठाबाहेरील व्यक्ती सुद्धा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक आहेत.  त्यात जळगाव विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख अशोक महाजन, जळगाव विद्यापीठातील बी. वी.  पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दीपक पानसकर, मुंबई विद्यापीठातील डॉली सनी,मुंबई विद्यापीठाच्या डिस्टन्स अँड ओपन लर्निंग विभागाचे संचालक पी.ए.महानवर, कोल्हापूर विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागातील प्रा. संजय चव्हाण, कोल्हापूर विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता श्रीकृष्ण महाजन, शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे विजय फुलारी, औरंगाबाद विद्यापीठाचे बी. एम.  मुळे,  जळगाव विद्यापीठाचे एम. एस. पगारे, उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा.धनंजय माने,नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे , लोणेरे विद्यापीठाचे एसबी देवसारकर,मुंबई विद्यापीठाचे संजय देशमुख आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांचीही पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे.