महाविद्यालयाचे तुघलकी फर्मान; मुलगा-मुलगी एकत्र बसल्यास, गप्पा मारल्यास थेट प्रवेश रद्द

विद्यार्थी एकत्र बसलेले किंवा हसताना दिसले तर त्यांचे प्रवेश  रद्द केले  जाईल, असे  पत्र महाविद्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. कॉलेजचे प्राचार्य इद्रिस आलम यांनी जारी केलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाविद्यालयाचे तुघलकी फर्मान; मुलगा-मुलगी एकत्र बसल्यास, गप्पा मारल्यास थेट प्रवेश रद्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये मुलगा-मुलगी एकत्र असणे, बोलणे, थट्टा-मस्करी करणे ही गोष्ट तशी सर्वसामान्य बनली आहे. पण याच गोष्टींवर बिहारमधील ZA इस्लामिया पीजी कॉलेजमध्ये (ZA Islamia PG College) बंदी आणण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या  प्राचार्यांनी या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. (Bihar College Decision)

विद्यार्थी एकत्र बसलेले किंवा हसताना दिसले तर त्यांचे प्रवेश  रद्द केले  जाईल, असे  पत्र महाविद्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. कॉलेजचे प्राचार्य इद्रिस आलम यांनी जारी केलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विद्यापीठाच्या पाच नामवंत माजी विद्यार्थ्याचा धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते सत्कार

पत्रात लिहिले आहे की, "महाविद्यालय कॅम्पसमध्ये मुलगा आणि मुलगी एकत्र बसलेले, गप्पा मारत असताना दिसल्यास त्यांचे प्रवेश  रद्द केले जातील. हे लक्षात घ्यावे की, कलम २९ आणि ३० अंतर्गत "हे अल्पसंख्याक महाविद्यालय आहे. भारत सरकारच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. त्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे अधिकार नियामक मंडळाकडे आहेत."

प्राचार्य इद्रिस आलम यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, "ही फार मोठी बाब नाही. काही दिवसांपूर्वी मुलींमध्ये भांडण झाले होते. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचे  अफेअर होते,  मुलांना घाबरवण्यासाठी आम्ही असे पत्र जारी केले आहे."  मात्र या पत्रातील भाषा चुकीचे आहे. असे लिहायला नको होते. याची मला जाणीव आहे, असे म्हणत प्राचार्यांनी आपल्या आदेशावरून घुमजाव केला आहे. या पत्रावरून मात्र मोठा वाद निर्माण झाला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k