सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा...  व्हिडिओ व्हायरल

विद्यापीठाकडे सभासद नोंदणीसाठी परवानगी घेण्यात आlली होती; तरीही या दोन संघटनांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा...  व्हिडिओ व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad -ABVP) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) (student Federation of India- sfi) या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी घडली. त्यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. काही वर्षांपूर्वी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये गंभीर स्वरूपाची हाणामारी झाली होती.त्यामुळे या दोन संघटनांमधील वाद पुन्हा एकदा उकळून आला आहे का ? अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.

हेही वाचा : पीआरएन ब्लॉकमूळे विद्यार्थी संतप्त ; २०१९ च्या पत्राने घातला गोंधळ

पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्री जवळ विद्यार्थ्यांना दुपारी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून खिचडी वाटपाचे काम केले जाते. विद्यापीठातील काही मेस बंद असल्याने येथे विद्यार्थी मोठ्या संख्येने खिचडी घेण्यासाठी येतात.ही बाबा लक्षात घेऊन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने येथे नोंदणीचे काम सुरू केले होते.सभासद नोंदणीवरून हा वाद झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यापीठाकडे सभासद नोंदणीसाठी परवानगी घेण्यात आlली होती; तरीही या दोन संघटनांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हाणामारी झाल्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.या संदर्भातील दोन्ही संघटनांच्या तक्रारी एकूण घेण्याचे काम सुरू असल्याचे विद्यापीठच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.