भारतात शास्त्रज्ञ, डॉक्टरांपेक्षा शिक्षकांवर अधिक भरवसा; अभ्यासातून आले समोर

भारतात शिक्षकांनंतर सशस्त्र दलातील जवान दुसऱ्या क्रमांकावर असून डॉक्टर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय भारतातील लोकांचा न्यायाधीश, शास्त्रज्ञ आणि प्रसारमाध्यमांवर कमी विश्वास आहे.

भारतात शास्त्रज्ञ, डॉक्टरांपेक्षा शिक्षकांवर अधिक भरवसा; अभ्यासातून आले समोर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

शिक्षणाचे (Education) बाजारीकरण झाले आहे, आताचे शिक्षक (Teachers) पूर्वीसारखे नाहीत, अशी ओरड अनेकदा होत असली तरी भारतीयांचा सर्वाधिक विश्वास शिक्षकांवरच आहे, असे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. इप्सॉस ग्लोबल ट्रस्टवर्थिनेस इंडेक्सचा २०२३ (IPSOS Global Trustworthiness Index 2023) चा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतात (India) सर्वाधिक विश्वास शिक्षकांवर असल्याचे दिसते. तर जगभरातील लोकांचा डॉक्टरांवर सर्वाधिक विश्वास आहे.

 

भारतात शिक्षकांनंतर सशस्त्र दलातील जवान दुसऱ्या क्रमांकावर असून डॉक्टर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय भारतातील लोकांचा न्यायाधीश, शास्त्रज्ञ आणि प्रसारमाध्यमांवर कमी विश्वास आहे. भारतासह ३१ देशांतील लोकांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा... व्हिडिओ व्हायरल

 

सर्वेक्षणानुसार ५३ टक्के लोकांनी भारतातील शिक्षकांवर, ५२ टक्के लोकांनी सशस्त्र दलांवर आणि ५१ टक्के लोकांनी डॉक्टरांवर विश्वास व्यक्त केला. याशिवाय ४९ टक्के लोकांनी शास्त्रज्ञांवर, ४६ टक्के लोकांचा न्यायाधीशांवर, ४६ टक्के लोकांनी  सामान्य स्त्री-पुरुषांवर आणि ४५ टक्के  लोकांनी बँकर्सवर विश्वास व्यक्त केला आहे. 

 

जागतिक स्तरावर, ५८ टक्के लोकांनी डॉक्टरांना, ५७ टक्के लोकांनी शास्त्रज्ञांना, ५३ टक्के लोकांनी शिक्षकांना आणि सशस्त्र दलातील सदस्यांना सर्वात विश्वासार्ह मानले आहे. भारतीयांनी कॅबिनेट मंत्र्यांवर ३९ टक्के लोकांनी, राजकारणी लोकांवर ३८ टक्के,  पोलिसांवर ३३ टक्के, सरकारी कर्मचारी आणि नागरी सेवकांवर ३२ टक्के, वकिलांवर ३२ टक्के आणि पत्रकारांवर ३० टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे.

 

याबाबतीत, जागतिक स्तरावर मात्र वेगळेच चित्र आहे. ५३ टक्के लोकांनी कॅबिनेट मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तर जगातील ६० टक्के लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k