पीआरएन ब्लॉकमूळे विद्यार्थी संतप्त ; २०१९ च्या पत्राने घातला गोंधळ 

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामूळे गोंधळ निर्माण झाला असून तो कसा सोडवायचा यावर विद्यापीठ प्रशासन विचार करत आहेत. मात्र, संपूर्ण  शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

पीआरएन ब्लॉकमूळे  विद्यार्थी संतप्त ; २०१९ च्या पत्राने घातला गोंधळ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) हजारो विद्यार्थ्यांचे पीआरएन ब्लॉक (Permanent Registration Number- PRN) केले आहेत. मात्र,आमची कोणतीही चूक नसताना आमचे पीआरएन ब्लॉक का केले ? असा सवाल विद्यार्थी ( (student) ) उपस्थित करत आहेत. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने (University exam department) २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामूळे गोंधळ निर्माण झाला असून तो कसा सोडवायचा यावर विद्यापीठ प्रशासन विचार करत आहेत.मात्र, संपूर्ण  शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

हेही वाचा : विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांचे 'पीआरएन' ब्लॉक ; काय आहे नेमके कारण ?

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी ) सत्रपूर्ती बाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.त्याबाबत २०१५ मध्ये सूचना निर्गमित केल्या होत्या.सध्या विद्यापीठ त्याचा सूचनांचे पालन करता आहेत.मात्र, विद्यापीठाच्या तत्कालीन परीक्षा संचालकांनी २०१९ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना युजीसीपेक्षा अधिक वर्ष सत्रपूर्तीसाठी दिली गेली आहेत.विद्यार्थ्यांनी याच पत्राचा आधार घेऊन आम्हाला परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली आहे.

एकूणच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आलेला कालावधी व यजीसीने दिलेला कालावधी यात मोठी तफावत आहे.विद्यापीठाने आपल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, असा आग्रह विद्यार्थ्यांकडून धरला जात आहे. तसेच २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या परीपत्रकाचा विचार करूनच आम्ही अभ्यास केला होता.त्यामुळे आमची परीक्षेची संधी नाकारू नका, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
 दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देता यावी, यासाठी विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्रव्यवहार केला जात आहे.युजीसीकडून सवलत मिळाली तर अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो.त्यामुळे युजीसी काय निर्णय देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.