आयुष NEET UG २०२३ समुपदेशन वेळापत्रक जाहीर; चार फेऱ्यांमधून होणार प्रवेश

समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी  नोंदणी प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ४ सप्टेंबर रोजी संपेल. चॉईस फिलिंग आणि लॉकिंगची सुविधा २ सप्टेंबरपासून सुरू होईल

आयुष NEET UG २०२३ समुपदेशन वेळापत्रक जाहीर; चार फेऱ्यांमधून होणार प्रवेश
AYUSH NEET UG Counselling 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आयुष प्रवेश केंद्रीय समुपदेशन समिती (AACCC) ने आयुष NEET UG 2023 चे समुपदेशन वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवार AACCC च्या अधिकृत संकेतस्थल aaccc.gov.in द्वारे समुपदेशन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

AACCC  ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी  नोंदणी प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ४ सप्टेंबर रोजी संपेल. चॉईस फिलिंग आणि लॉकिंगची सुविधा २ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ४ सप्टेंबर  रोजी बंद होईल. जागा वाटप प्रक्रिया ५ ते ६ सप्टेंबर  दरम्यान केली जाईल.

SPPU News : ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’साठी सरकार तिजोरी उघडणार का?

जागा वाटपाची यादी ७ सप्टेंबर रोजी घोषित केली जाईल. विद्यार्थी ८ ते १३ सप्टेंबर पर्यंत वाटप केलेल्या संस्थांमध्ये आवश्यक कागदपत्रे जमा करू शकतात. आयुष नीट यूजी समुपदेशनाच्या चार फेऱ्या होतील. चौथी फेरी स्ट्रे व्हेकन्सी राउंड असेल. तिसर्‍या फेरीनंतर अभिमत विद्यापीठाच्या रिक्त जागांची आणि पात्र उमेदवारांची यादी ६ नोव्हेंबर रोजी अभिमत विद्यापीठांकडे स्ट्रे व्हॅकन्सी फेरी आयोजित करण्यासाठी पाठवली जाईल.

AACCC समुपदेशनाच्या स्ट्रे व्हॅकेंसी फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा संबंधित राज्यांमध्ये हस्तांतरित केल्या जाणार नाहीत, असे AACCC कडून सांगण्यात आले आहे. AACCC, आयुष मंत्रालय सरकारी/सरकारी अनुदानित, राष्ट्रीय संस्था, केंद्रीय विद्यापीठे आणि आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथीच्या डीम्ड विद्यापीठांतर्गत UG आणि PG अभ्यासक्रमांच्या AIQ (ऑल इंडिया कोटा) जागांवर प्रवेशासाठी समुपदेशन करेल.

खाजगी आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी संस्थांच्या UG आणि PG अभ्यासक्रमांमधील AIQ जागांसाठी प्रवेशासाठीचे समुपदेशन राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या संबंधित समुपदेशन प्राधिकरणाद्वारे केले जाईल.

समुपदेशन फेरीच्या वेळापत्रकासाठी या लिंकवर क्लिक करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo