AI University : देशातील पहिल्या विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होणार, कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस

'युनिव्हर्सल एआय' विद्यापीठात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस (Green campus) तयार केला आहे.

AI University : देशातील पहिल्या विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होणार, कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस
Universal AI University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कृत्रित बुध्दिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. त्याचअनुषंगाने देशातील पहिले AI विद्यापीठ (AI University) महाराष्ट्रातील कर्जत येथे उभारण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात म्हणजे प्रत्यक्ष अध्यापनाला दि. १ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने (Higher Education Department) काही महिन्यांपूर्वी या विद्यापीठाला मान्यता दिली आहे.

'युनिव्हर्सल एआय' विद्यापीठात (Universal AI University) विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस (Green campus) तयार केला आहे. विद्यापीठाने एआय आणि फ्युचर टेक्नॉलॉजीतील पदवी आणि विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केला आहे.  आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या क्षेत्रातील खास विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवले  जाणार आहे. 

SPPU News : विद्यापीठातील अनेक विभाग पडणार ओस, २५ अभ्यासक्रमांना जागांपेक्षा कमी अर्ज

एआय आणि मशीन लर्निंग (एमएल), बिझनेस अॅनालिटिक्स, लिबरल आर्ट्स, सायकोलॉजी आणि इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, फायनान्स, मार्केटिंग आणि कॉमर्समधील स्पेशलायझेशनसह बिझनेस स्टडीज हे मुख्य विषय असतील. तसेच  ग्लोबल अफेअर्स व डिप्लोमसी, कायदा, पर्यावरण व शाश्वतता आणि क्रीडा विज्ञान आदी विषयांवरील आधुनिक अभ्यासक्रमही या ठिकाणी शिकवले जाणार आहेत. हा पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असून या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण असावेत. कोणत्याही शाखेतील कोणत्याही भारतीय किंवा परदेशी विद्यार्थ्यांना या  अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहे.  

'युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने' प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना त्या अभ्यासक्रमाचा मूळ गाभा AI शी जोडलेला असेल याची काळजी घेतली आहे. अभ्यासक्रमाच्या  प्रथम आई द्वितीय वर्षात AI, ML, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR), मिश्रित वास्तव (MR), आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) यासह उदयोन्मुख तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना  सखोल माहिती दिली जाईल.

अखेर ‘फार्मसी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

अंतिम वर्षात, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांवर AI च्या प्रभावाचा शोध घेणारा प्रकल्प हाती घेऊ त्यावर काम करावे लागेल.   ज्यामध्ये ५०-७० टक्के अध्यापनशास्त्राचा समावेश असलेल्या अनुभवात्मक शिक्षणावर महत्त्वपूर्ण भर दिला जाईल. याचा एक भाग म्हणून, प्रत्येक पदवीधर विद्यार्थी एक शोधनिबंध किंवा केस स्टडी लिहून प्रकाशित करेल.

विद्यापीठाविषयी अधिक माहितीसाठी - https://www.universalai.in/

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD