ICSI CSEET निकाल जाहीर 

महत्वपूर्ण बाब म्हणजे CSEET निकालाचे पुनर्मूल्यांकन करता येणार नाही.

ICSI CSEET निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने ICSI कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) जानेवारी २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ICSI CSEET निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. जानेवारी सत्रासाठी ICSI CSEET २०२४ परीक्षा ६ जानेवारी आणि ८ जानेवारी रोजी रिमोट प्रॉक्टोर्ड मोडमध्ये घेण्यात आली.महत्वपूर्ण बाब म्हणजे CSEET निकालाचे पुनर्मूल्यांकन करता येणार नाही.

शुक्रवारी जाहीर झालेला ICSI CSEET निकाल अंतिम आहे. तसेच  निकालाची हार्ड कॉपी आणि स्कोअरकार्ड उमेदवारांना स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाहीत, असे आयसीएसआय स्प ष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण आणि एकूण ५०% गुण मिळवलेले उमेदवार ICSI CSEET २०२४ परीक्षा उत्तीर्ण असतील.   ICSI CSEET जानेवारी २०२४ ची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यापासून एका वर्षाच्या आत CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा : वयाच्या 21व्या वर्षीच विनायकने गाजवलं एमपीएससीचं मैदान ; आधी उपशिक्षण अधिकारी , आता राज्यात प्रथम
ICSI CSEET मध्ये पात्र ठरलेले उमेदवार ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पुढील स्तरावरील CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी नोंदणी करू शकतात.  जे उमेदवार ICSI CSEET २०२४ जानेवारी परीक्षेत पात्र होऊ शकले नाहीत त्यांना मे, जुलै किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित CSEET परीक्षेत पुन्हा बसण्याचा पर्याय आहे. अशा उमेदवारांना पुन्हा ICSI CSEET नोंदणी फॉर्म भरावा लागेल.

असा करा निकाल डाउनलोड 

* icsi.edu अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावरील विद्यार्थी टॅबवर जा.
* ड्रॉप डाउन मेनूमधून CSEET वर क्लिक करा.
* CSEET निकालावर क्लिक करा.
* तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
* परिणाम स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
*  निकालाची प्रिंटआउट घ्या.