काय सांगता ...एलएलबी परीक्षेत आयपीएस अधिकाऱ्यालाच पकडले कॉपी करताना 

लखनऊ येथील धक्कादायक घटना 

काय सांगता ...एलएलबी परीक्षेत आयपीएस अधिकाऱ्यालाच पकडले कॉपी करताना 

एज्युवार्ता  न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माजी आयपीएस अधिकाऱ्याला (Ex-IPS officer) परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडण्यात आले आहे. एलएलबी परीक्षेदरम्यान आयपीएस अधिकारी गैरप्रकार (copy)  करत होता.

फ्लाइंग स्क्वॉडने त्याला ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती भाषा विद्यापीठात (Khwaja Moinnuddin Chisti Language University -KMCLU) कॉपी करताना पकडले. सुमारे दिवसापूर्वीही तो कॉपी करताना पकडला गेल्याचे सांगितले जात आहे.मात्र, विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण दडपल्याचा आरोप होत आहेत.

फसवणुकीच्या आरोपाखाली पकडलेल्या उमेदवाराचे नाव राजेश कुमार असून तो भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झाला आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती भाषा विद्यापीठात एलएलबी परीक्षेत गैरप्रकार  करणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याला फ्लाइंग स्क्वॉडने गुरुवारी पकडले. बुधवारीही परीक्षेत फसवणूक करताना पकडले गेल्याचा आरोप आहे, मात्र,  नंतर विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण दडपले. सलग दुसऱ्या दिवशी त्याला पकडले असता ही बाब उघडकीस आली. यानंतर त्याची प्रत सील करण्यात आली आहे.  आता त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

परीक्षेत गैरप्रकार  करणाऱ्या उमेदवाराच्या कॉपीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांचे म्हणणे आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्याने  विद्यापीठाच्या 3 वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. तो पहिल्या सेमिस्टरची परीक्षा देत असल्याचे सांगण्यात येत आहे.