या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया बार एक्झामिनेशन AIBE 18 चा निकाल रोखला

ज्या उमेदवारांनी नावनोंदणी प्रमाणपत्राऐवजी इतर कागदपत्रे अपलोड केली आहेत. त्यांचा AIBE परीक्षा निकाल 2024 रोखण्यात आला आहे.

या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया बार एक्झामिनेशन AIBE 18 चा निकाल रोखला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (All India Bar Examination-AIBE) 18  2024 चा निकाल जाहीर केला आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचा निकाल कौन्सीलने रोखला आहे.  परीक्षेला बसलेले उमेदवार allindiabarexamination.com या अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात.

ज्या उमेदवारांनी नावनोंदणी प्रमाणपत्राऐवजी इतर कागदपत्रे अपलोड केली आहेत. त्यांचा AIBE परीक्षा निकाल 2024 रोखण्यात आला आहे. परिषदेने अशा उमेदवारांना 10 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले असून येत्या 15 एप्रिलपर्यंत त्यांचे निकाल जाहीर केले जातील.

"त्या उमेदवारांनी त्यांचे नावनोंदणी प्रमाणपत्रे bci.helpdesk@smartexams.in या ईमेल पत्त्यावर 10 एप्रिल 2024 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांचे निकाल 15 एप्रिल 2024 पर्यंत घोषित केले जातील," असे परिषदेने म्हटले आहे. AIBE 18 ची परीक्षा 10 डिसेंबर रोजी झाली होती.