वयाच्या 21व्या वर्षीच विनायकने गाजवलं एमपीएससीचं मैदान ; आधी उपशिक्षण अधिकारी , आता राज्यात प्रथम
विनायकने फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएससी स्टॅटिस्टिक केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या (State Services Main Exam 2022) गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विनायक पाटीलने (Vinayak Patil) वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षीच (At the age of 21) एमपीएससीचे (MPSC) मैदान गाजवले आहे. विनायकने यापूर्वी एमपीएससीतून उपशिक्षण अधिकारी (Deputy Education Officer) पद मिळवले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या विनायकने कमी वयात आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठी कामगिरी करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसमोर मोठा आदर्श उभा केला आहे.विनायकची जन्म तारीख 6 फेब्रुवारी 2001 आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आले असून मुलाखत दिलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आहे. विनायक ने त्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 622 गुण मिळवले आहेत. कमी वयात केलेल्या त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र यापुढे प्रिप्रेशन थांबवणार असून प्रशासनात सेवा देणार असल्याचे विनायकने 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.
विनायक म्हणाला, मी फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएससी स्टॅटिस्टिक केले. 2021 मध्ये माझे शिक्षक पूर्ण झाले असून मी कोल्हापूरमध्येच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. माझे आई-वडील दोघेही शेती करतात. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातील मुदाळ या गावचा रहिवासी आहे. निकाल पाहून खूप आनंद झाला असून माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना देत आहे.