कोटानंतर आता आयआयटीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू 

आयआयटी कानपूरमध्ये एका महिन्यात तीन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

कोटानंतर आता आयआयटीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राजस्थानच्या कोटा(Kota of Rajasthan)शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे चिंता व्यक्त केली जात असताना आणखीन एक भीतीदायक माहिती समोर येत आहे. आयआयटी कानपूरमध्ये (IIT Kanpur) एका महिन्यात तीन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी मुलींच्या वसतिगृहात एका पीएचडी विद्यार्थिनीने आत्महत्या (PhD student commits suicide)केल्याचे उघड झाले आहे.  

झारखंडमधील दुमका येथील रहिवासी असलेली प्रियांका जैस्वाल केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करत होती. प्रियांकाने आयआयटी कानपूरमध्ये २९ डिसेंबर २०२३ रोजीच प्रवेश घेतला होता. प्रियंकाचे वडील नरेंद्र जयस्वाल हे सकाळपासून आपल्या मुलीला फोन करत होते, मात्र, प्रियांकाचा फोन येत नव्हता. यामुळे त्यांनी हॉस्टेल मॅनेजर रितू पांडेला फोन केला. आपली मुलगी सकाळपासून फोन उचलत नसल्याचे त्यांनी वसतिगृह व्यवस्थापकाला सांगितले. रितू पांडे यांनी जाऊन पाहिले असता खोली आतून बंद होती. त्याने प्रियांकाला अनेकदा फोन केला. सोबतच दरवाजा ठोठावला, पण आतून आवाज आला नाही. खिडकीतून डोकावले असता प्रियांकाचा मृतदेह फासावर लटकलेला होता.  पांडे यांनी आत्महत्येची माहिती आयआयटी प्रशासन आणि पोलिसांना दिली.

हेही वाचा : भारतीय भाषांमध्ये तीन वर्षात अभ्यास साहित्य उपलब्ध करा ; शिक्षण विभागाचे निर्देश

 आयआयटी कानपूरमध्ये एका महिन्यात आत्महत्येची ही तिसरी घटना घडली आहे. IIT कानपूरमध्ये प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या पल्लवी चिल्लाका यांनी १९ डिसेंबर रोजी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. पल्लवी मूळची ओडिशाची. यानंतर १० जानेवारी रोजी मेरठ येथील कंकरखेडा येथील विकास कुमार मीना यांनी आत्महत्या केली. विकास कुमार एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये एमटेक करत होता . विकास मीना यांनी सुसाईड नोट लिहिली होती. त्यांच्या खोलीतून ही सुसाईड नोट कोणीतरी चोरली होती. पोलीस सुसाईड नोट शोधत आहेत.