Sarthi : फेलोशिपसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा लढा, ‘सारथी’समोर आंदोलन

विद्यार्थ्यांकडून दोन दिवस हे आंदोलन केले जाणार आहे. सारथी अंतर्गत कुणबी व मराठा समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात.

Sarthi : फेलोशिपसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा लढा, ‘सारथी’समोर आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे सारथी (Sarthi) अंतर्गत संशोधन करणाऱ्या कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (Maratha) अधिछात्रवृत्ती (Fellowship) दिली जाते. या वर्षीपासून केवळ ५० विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्यात येणार असल्याने समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी गुरूवार (दि. १९) पासून पुण्यातील (Pune) सारथीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

 

विद्यार्थ्यांकडून दोन दिवस हे आंदोलन केले जाणार आहे. सारथी अंतर्गत कुणबी व मराठा समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी समाजातील संशोधन वाढीस लागण्यासाठी व उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाची टक्केवारी वाढण्यासाठी २०१९ पासून पी.एच.डी. करणाऱ्या होतकरू गरीब कुणबी मराठा विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृति म्हणजेच फेलोशिप देण्यास सुरुवात करण्यात आली.

Pune News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू

 

२०१९ ते २०२२ या चार वर्षाच्या कालावधीत २ हजार १३२ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आली. म्हणजे सरासरी प्रतिवर्ष ५०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला. मात्र काही दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून सरकारने निर्णय घेतला की, सारथी मध्ये फक्त ५० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येईल. हा अन्यायकारक निर्णय तत्काळ मागे घेऊन २०२३ साठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्याची सरसकट निवड करून न्याय दयावा, या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय ठिय्या आंदोलनाचा लढा सुरू केला आहे.

 

२०२३ बॅचच्या PhD करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप देण्यात यावी, सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी प्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृती देण्यात यावी, भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२३ पासून अधिछात्रवृती मानधनात वाढ करण्यात आली आहे, त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी, या संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, अशी माहिती प्रा. संभाजी खोत, प्रा. बापुराव माने, प्रा. निखिल मगर व सचिन आडेकर यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k