वा ! याला म्हणतात मैत्री , तीन जीवलग मैत्रीणी एकाच वेळी झाल्या पोलीस

सोनालीची अकोला, ज्योतीची ठाणे येथे तर दुर्गाची रायगड येथे निवड झाली आहे. या तीघीही कान्होरी गावच्या रहिवाशी असल्यानं या गावाला एकाच वेळी तीन पोलीस मिळाले आहेत.

वा ! याला म्हणतात मैत्री , तीन जीवलग मैत्रीणी एकाच वेळी झाल्या पोलीस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आपल्या सुख-दु:खात साथ देणाऱ्या व्यक्तीला आपण जीवलग मित्र माणतो. आजपर्यंत एकमेकांना साथ देणारी घनिष्ठ मैत्रीची आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. परंतु संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जीवलग मैत्रीणींनी एकाचवेळी पोलीस Three best friends became police होत एक वेगळाच आदर्श उभा केला आहे.

संभाजीनगर sambhaji nagar जिल्ह्यातील फुलंब्री या तालुक्यातील सोनाली म्हस्के, ज्योती बारवाल, दुर्गा म्हस्के या तीन जीवलग मैत्रीणी असून तिघींचीही घरची परिस्थीतीची बेताचीच आहे. परंतु तीघींनीही घरची परिस्थीती बदलायची असा दृढ निश्चय करून जिद्दीला पेटून सोबतच अभ्यासाला सुरूवात केली. तसेच त्यांनी पोलीस भरतीचे मार्गदर्शनही एकाच ठिकाणी घेतले. तीघींनीही नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीची परिक्षा दिली.या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून तीघींचीही पोलीस दलात निवड झाली आहे.

हेही वाचा : हॅकरच्या दाव्यावर MPSC कडून मोठा खुलासा; विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती, प्रश्नपत्रिकेबाबत स्पष्टीकरण

सोनालीची अकोला, ज्योतीची ठाणे येथे तर दुर्गाची रायगड येथे निवड झाली आहे. या तीघीही कान्होरी गावच्या रहिवाशी असल्यानं या गावाला एकाच वेळी तीन पोलीस मिळाले आहेत. कान्होरी गावासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे कान्होरी ग्रामपंचायतीकडून या तिन्हीही मुलींचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला आहे. 

शालेय जीवनापासूनच तीघींचेही पोलीस होण्याचे स्पप्न होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण होताच त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. मान लावून अभ्यास आणि ग्राउंडचीही तयारी तितकीच जोरदार केली.  आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस झाल्यानं तीघींनीही आनंदाची भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान, या तीघींच्याही पालकांकडे पुरेशी शेती नसल्यानं ते इतरांच्या शेतात मजूरीसाठी जातात. मुली पोलीस झाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुली पोलीस झाल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. सोनली, ज्योती आणि दुर्गामुळं त्यांच्या पालकांचीही मान अभिमानानं ताठ झाली आहे.