HSC Exam : विद्यार्थ्यांनो, पुरवणी परीक्षेच्या तयारीला लागा! सोमवारपासून अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून २९ मे ते ९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. तर विलंब शुल्कासह १० जून ते १४ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील.

HSC Exam : विद्यार्थ्यांनो, पुरवणी परीक्षेच्या तयारीला लागा! सोमवारपासून अर्ज भरता येणार
HSC Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result) गुरुवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी (Supplementary Examination) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. (Maharashtra HSC Result)

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच अर्ज भरावेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी दिली.

वडिलांनी केला मुलीचा बारावीचा निकाल जाहीर; बोर्डाच्या अध्यक्षांचा असाही योगायोग

विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून २९ मे ते ९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. तर विलंब शुल्कासह १० जून ते १४ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. उच्च माध्यमिक शाळांनी किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा १ ते १५ जून ही आहे. तर शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळामध्ये जमा करण्याची तारीख १६ जून ही आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विपरीत परिस्थितीशी झगडा देत कचरावेचक कामगारांच्या मुलांचे नेत्रदीपक यश

सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदन अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या तारखांमध्ये कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन अर्ज भरा या संकेतस्थळावर : www.mahahsscboard.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo