MPSC Exam : संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत मोठी अपडेट

आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

MPSC Exam : संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत मोठी अपडेट
MPSC Hall Ticket

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ४ जून रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ (MPSC Exam 2023) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर (MPSC Website) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्रच ग्राह्य धरले जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (MPSC Hall Ticket)

आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनो, पुरवणी परीक्षेच्या तयारीला लागा! सोमवारपासून अर्ज भरता येणार

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील 'Guidelines for Examination' या सदराखाली उपलब्ध असलेल्या सुचनांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.

विपरीत परिस्थितीशी झगडा देत कचरावेचक कामगारांच्या मुलांचे नेत्रदीपक यश

सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल. प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल, असे आयोगाने म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo