11th admission :  मुंबईत १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश; महाविद्यालयांचा कटऑफ पाहा... 

मुंबई महानगर क्षेत्र परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ लाख ३६ हजार ५२० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख १५ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला होता.

11th admission :  मुंबईत १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश; महाविद्यालयांचा कटऑफ पाहा... 
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (School Education Department) मुंबई (Mumbai) महानगर क्षेत्र परिसरातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून मुंबईतील १ लाख ३६ हजार २२९ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरी अंतर्गत प्रवेश ॲलॉट करण्यात आले आहेत. तब्बल ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमानुसारच प्रवेश मिळाला आहे. (11th Admission Selection List)

मुंबई महानगर क्षेत्र परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ लाख ३६ हजार ५२० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख १५ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला होता. त्यातील १ लाख ३७ हजार २२९ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरी अंतर्गत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या ३२ हजार ६७८ जागा, कॉमर्स शाखेच्या १ लाख २३ हजार ६२७ जागा तर सायन्स शाखेच्या ७६ हजार ८९७ जागा उपलब्ध आहेत.

11th Admission : पुण्यात ४२ हजार विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड; विज्ञान शाखेत कोणते महाविद्यालय टॉपवर?

पहिला पसंतीक्रम भरलेल्या ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून दुसऱ्या पसंती क्रमानुसार २१ हजार ९३४, तिसऱ्या पसंती क्रमानुसार १५ हजार ६३, चौथ्या प्रसंती क्रमानुसार ११ हजार ७२२, पाचव्या पसंती क्रमानुसार ९ हजार ३२०, सहाव्या पसंती क्रमानुसार ६ हजार ७४९, सातव्या पसंती क्रमानुसार ५ हजार १६८ ,आठव्या पसंती क्रमानुसार ३ हजार ८४३, नवव्या पसंती क्रमानुसार २ हजार ८८८, तर दहाव्या पसंती क्रमानुसार २ हजार २१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo

मुंबईतील महाविद्यालयांचा कटऑफ -