अकरावी प्रवेशाचा अर्ज भरला का ? आत्तापर्यंत ६० हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

राज्यातील काही महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.त्यात मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर यांचा समावेश आहे.

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरला का ? आत्तापर्यंत  ६०  हजार  विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
11 th admission

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

11 th admission :  राज्याच्या शालेय शिक्षण विभातर्फे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस (11th Online Admission Process ) सुरूवात करण्यात आली असून दहावीचा निकाल (10 th result ) जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग (first part of 11th admission form) भरून घेतला जात आहे.त्यात पुण्यातील १६  हजार, मुंबईतील ३९  हजार ,नागपूर येथील २  हजार,  नाशिकमधील दीड हजार तर आमरावतीच्या 1 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे केवळ तीन दिवसात ६०  हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरू शकतील. 
    दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील काही महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.त्यात मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर यांचा समावेश आहे.  २५  मे पासून  अकरावी  प्रवेशाचा  ऑनलाईन अर्ज भरण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सुरूवातीला प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी संधी देण्यात आली होती.२५  मे पासून २७  मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुण्यात १६ हजार ५५४  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. 

पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केलेल्या १६ हजार ५५४ विद्यार्थ्यांपैकी  ७ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केला आहे. त्यातील ३ हजार ७३ विद्यार्थ्यांचा अर्ज ऑटो व्हेरिफाय झाला आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालापर्यंत प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी मुदत दिली आहे.तर दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दूसरा भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाईल. त्यात विद्यार्थ्यांना आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजचे पसंती क्रमांक नोंदवावे लागणार आहेत. 

ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना  ऑनलाइन अर्ज  करून लॉग इन आयडी  आणि पासवर्ड  मिळवायचा आहे. त्याचबरोबर अकरावी प्रवेशाचा भाग एक भरून ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे आहे. सध्या अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले जातील. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुस-या आणि तिस-या त्यासोबतच विशेष फेरीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे.