खबरदार : आपल्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची जात विचारू नका!

एखाद्या विद्यार्थ्याचा रँक जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा देखील जात पडताळण्याचा प्रयत्न असू शकतो. असे केल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश संस्थेकडून देण्यात आले आहेत.

खबरदार : आपल्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची जात विचारू नका!
IIT Bombay Guidelines

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

संस्थेत जाती आधारित भेदभाव (Castism) होतो, अशी तक्रार करत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) च्या दर्शन सोलंकी (Darshan Solanki) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर IIT मुंबई  कडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आपल्या सोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांची जात उघड होईल, असा कोणताही प्रश्न विद्यार्थ्यांनी (Students) एकमेकांना विचारू नये, असे निर्देश संस्थेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत.

संस्थेने २९ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, 'कोणत्याही विद्यार्थ्याला त्याची जात, प्रवेश किंवा वर्ग याबद्दल विचारणे अयोग्य आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअरबद्दल विचारणे देखील अयोग्य आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा रँक जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा देखील जात पडताळण्याचा प्रयत्न असू शकतो. असे केल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश संस्थेकडून देण्यात आले आहेत.

IIT Bombay : मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये बंदी, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

अपमानास्पद, द्वेषपूर्ण किंवा जातीयवादी विनोदांवर बंदी घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या दर्शन सोलंकी IIT मुंबईमध्ये बीटेक (केमिकल) प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने १२ फेब्रुवारी रोजी आयआयटी मुंबई  कॅम्पसच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सोलंकीने संस्थेत होत असलेल्या जाती-आधारित भेदभावाबाबत आईला सांगितले होते. त्याची जात कळल्यानंतर काही सहकाऱ्यांच्या वागणुकीत बदल झाल्याचेही त्याने आपल्या आईला फोनवरून सांगितले होते. या घटनेनंतर संस्थेवर बरेच आरोप प्रत्यारोप लावण्यात आले होते. दरम्यान IIT मुंबईच्या कँटीन मध्ये मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर निर्बंध घालण्यात आलेल्या प्रकारामुळे देखील संस्था विद्यार्थ्यांच्या  टीकेचे पात्र ठरत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD