CBSE Board Exam : १० वी च्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया होणार सुरु

जे विद्यार्थी  इयत्ता १०वी आणि  १२ वी च्या ५ विषयांची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना  नोंदणी शुल्क म्हणून दीड हजार  रुपये भरावे लागतील.

CBSE Board Exam : १० वी च्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया होणार सुरु
CBSE exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ज्या विद्यार्थ्यांना १० वी ची परीक्षा CBSE बोर्डातून खाजगी स्तरावर द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांची नाव नोंदणी १२ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. सर्व पात्र विद्यार्थी १२ सप्टेंबरपासून अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतील, अशी सूचना बोर्डाकडून (CBSE Board Exam) देण्यात आली आहे.

 

इच्छूक विद्यार्थ्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन शुल्क भरून अर्ज  भरता येणार आहेत. नोंदणी विंडो १९ ऑक्टोबर रोजी बंद होईल. दि. १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यान अर्ज केल्यास विद्यार्थ्यांना विलंब शुल्क म्हणून अतिरिक्त दोन हजार रुपये भरावे लागतील.

CBSE Board Exam : दहावी व बारावीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल

 

तसेच जे विद्यार्थी  इयत्ता १०वी आणि  १२ वी च्या ५ विषयांची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना  नोंदणी शुल्क म्हणून दीड हजार  रुपये भरावे लागतील. तर नेपाळमधील उमेदवारांना समान शुल्क भरावे लागेल परंतु इतर देशांमध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये नोंदणी शुल्क  भरावे  लागेल.

 

भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येक अतिरिक्त विषयासाठी तीनशे  रुपये द्यावे लागतील, तर नेपाळ आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एक हजार  आणि दोन हजार रुपये द्यावे लागतील. पुरवणी  परीक्षेची फी रचना अतिरिक्त विषयांप्रमाणेच आहे. प्रात्यक्षिक चाचणीसाठी, भारतीय आणि नेपाळी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी दीडशे  रुपये भरावे  लागतील, तर इतर देशांतील उमेदवारांना प्रत्येक विषयासाठी ३५० रुपये द्यावे लागतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j