G 20 Pune : जी २०  परिषदेनिमित्त शैक्षणिक जागराला सुरूवात

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विविध सत्रांमधून तज्ज्ञांनी पायाभूत  शिक्षण पद्धती नेमकी कशी असावी, त्यासाठी वापरले जाणारे अभिनव साहित्य याविषयी मार्गदर्शन केले.

G 20 Pune : जी २०  परिषदेनिमित्त शैक्षणिक जागराला सुरूवात
G 20 Workshop

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यात (Pune) पुढील आठवड्यात होत असलेल्या जी २० (G 20) परिषद शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya) पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र  शिक्षण पद्धती आणि  त्यासाठीची शैक्षणिक साधने या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा(Workshop) घेण्यात आली.

पुणे महापालिकेच्या (PMC) शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाचे उपायुक्त राजीव नंदकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विविध सत्रांमधून तज्ज्ञांनी पायाभूत  शिक्षण पद्धती नेमकी कशी असावी, त्यासाठी वापरले जाणारे अभिनव साहित्य याविषयी मार्गदर्शन केले.

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; २५ जूनपर्यंत भरा अर्ज

यावेळी बोलतान नंदकर म्हणाले, ३ ते ९ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया जेवढा मजबूत होईल तेवढी त्यावरील इमारत म्हणजे देशाचे  भविष्य उज्वल होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुलांच्या जडण घडणीत पालकांचा जेवढा वाटा असतो तेवढाच सहभाग शिक्षकांचा देखील असतो याची जाणीव प्रत्येक शिक्षकाने ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातील केंद्रीय प्रशालेच्या प्राचार्य संगीता गुटेन यांनी निपुण भारत अभियाांतर्गत पायाभूत साक्षरतेच्या विविध शिक्षण प्रणालीविषयी माहिती दिली. गणेशखिंड केंद्रीय विद्यालय मधील प्रा. सुरेखा नरके, खडकी केंद्रीय विद्यालयाचे प्रा. प्रबिर नाग  यांनीही संख्याशास्त्र विषयी मार्गदर्शन केले. केंद्रीय विद्यालयांच्या मुंबई विभागाच्या उपायुक्त सोना सेठ यांचेही यावेळी भाषण झाले.

NCERT विरोधात शिक्षणतज्ज्ञांचे बंड; पाठ्यपुस्तकातून नावे वगळण्याची ३३ जणांची मागणी

पुण्यातील विविध केंद्रीय विद्यालयातील शिक्षक , प्राचार्य आणि पालक या कार्यशाळेला उपस्थित होते. याशिवाय विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी पायाभूत शिक्षणासाठी आवश्यक विविध  साधने तयार केली असून त्यांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरवण्यात आले होते. केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo