‘सीओईपी अभिमान’ पुरस्कारांची घोषणा; अरुण कुदळे, फणसळकर, अचलेरकर यंदाचे मानकरी

सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गिते यांनी पुरस्कारांची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्याचे यंदा ३१ वे वर्ष आहे.

‘सीओईपी अभिमान’ पुरस्कारांची घोषणा; अरुण कुदळे, फणसळकर, अचलेरकर यंदाचे मानकरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP Pune) पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात अभियंता दिनानिमित्त येणारा ‘सीओईपी अभिमान’ (Coep Pride) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरूवार दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता सीओईपी च्या मुख्य सभागृह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गिते यांनी पुरस्कारांची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्याचे यंदा ३१ वे वर्ष आहे. यंदाच्या ‘सीओईपी अभिमान’ पुरस्काराने पुण्यातील ज्येष्ठ उद्योजक, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण कुदळे, मुंबईचे पोलिस आयुक्त आयपीएस विवेक फणसळकर, यूएसमधील निअर यू सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष अचलेरकर यांचा समावेश आहे.

यंदा वाचन प्रेरणा दिनी 'उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा'!

 

त्याचप्रमाणे ‘अनंत डिफेन्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’ चे संस्थापक आणि कार्यकारी संचालक चेतन धारिया, उत्कृष्ट वैज्ञानिक टीडी (सीएलएडब्ल्यू), एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, बंगलोरचे डॉ. विजय पटेल, एलिमेंट सोल्युशन्स इंक आणि कुकसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भारतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवी एम. भटकळ यांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. 

 

कार्यक्रमात बी.टेक. आणि एम.टेक. मध्ये उच्चश्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गिते यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j