SPPU News Update : कुलगुरू निवडीनंतर आता वेध प्र-कुलगुरू पदाचे; पुन्हा दिग्गजांची मोर्चेबांधणी

'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' असे संबोधल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी विराजमान होण्याची अनेकांना इच्छा असते.डॉ. सुरेश गोसावी हे पुणे विद्यापीठाचे एकविसावे कुलगुरू आहेत.

SPPU News Update : कुलगुरू निवडीनंतर आता वेध प्र-कुलगुरू पदाचे; पुन्हा दिग्गजांची मोर्चेबांधणी
SPPU Pro-VC Selection

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरू पदी (Vice Chancellor) डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांची निवड होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे आता विद्यापीठाच्या प्र-कलगुरू (Pro-Vice Chancellor) पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत विद्यापीठ वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांचा (Dean) कालावधी संपुष्टात आल्यामुळे पुढील पाच वर्ष अधिष्ठाता म्हणून आपल्याला संधी मिळावी, यासाठी सुद्धा संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठातील विभागांचे प्रमुख प्रयत्नशील आहेत.

'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' असे संबोधल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी विराजमान होण्याची अनेकांना इच्छा असते. डॉ. सुरेश गोसावी हे पुणे विद्यापीठाचे एकविसावे कुलगुरू आहेत. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नवीन कुलगुरू प्र-कुलगुरू आणि अधिष्ठात्यांची निवड करतात. पूर्वी राज्यपालांतर्फे प्र-कलगुरूंची नियुक्ती केली जात होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड केली जाणार आहे.

राज्यात १५० नवीन महाविद्यालये सुरू होणार; महिलांसाठी सर्वाधिक ३४... पुणे-मुंबई आघाडीवर

कुलगुरू या पदानंतर प्र-कुलगुरू या पदाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांकडून या पदासाठी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. विद्यापीठातील सुमारे ११ उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला होता. यातीलच एखाद्या उमेदवाराच्या गळ्यात प्र-कलगुरू पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य सुद्धा प्र-कुलगुरू पद मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे. विद्यापीठात होणाऱ्या जी २० च्या कार्यक्रमानंतर या प्रक्रियेला अधिक गती येईल. परिणामी येत्या महिन्याभरात विद्यापीठाला प्र- कुलगुरू मिळतील, असे बोलले जात आहे.

NCERT विरोधात शिक्षणतज्ज्ञांचे बंड; पाठ्यपुस्तकातून नावे वगळण्याची ३३ जणांची मागणी

कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या प्र-कुलगुरु आणि अधिष्ठात्यांचा कार्यकाल त्यांच्या कार्यकालाबरोबर संपुष्टात येतो.माजी प्रभारी कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी नियुक्ती केलेल्या अधिष्ठात्यांचा कार्यकालही संपुष्टात आला आहे. नव्या अधिष्ठात्यांची नियुक्ती होईपर्यंत जुने अधिष्ठाता हा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून आता नव्या अधिष्ठात्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून लवकरच जाहिरात काढली जाणार आहे. त्यामुळे पुढील  तीन महिन्यात विद्यापीठाला नवीन अधिष्ठाता मिळणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo