विद्यार्थ्यांना परदेशातील तांत्रिक स्पर्धांस जाण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये; AICTE चा निर्णय

विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. यात आंतरराष्ट्रीय प्रवास, देशांतर्गत प्रवास, नोंदणी शुल्क, व्हिसा अर्ज शुल्क, निवास आणि बोर्डिंग, विमानतळ कर, प्रवास, आरोग्य, विमा आणि स्पर्धा-संबंधित उपकरणे या खर्चाचा समावेश असेल.

विद्यार्थ्यांना परदेशातील तांत्रिक स्पर्धांस जाण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये;  AICTE चा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने तांत्रिक स्पर्धांमध्ये सहभागी (Participating in technical competitions) होण्यासाठी  परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. 'परदेशातील स्पर्धांमध्ये (Competitions abroad) सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सहाय्य' (AICTE- SSPCA) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, समुपदेशन आणि लॉजिस्टिक मार्गदर्शन आदी सर्व सुविधा (provide financial help) पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष टी.जी.सीताराम (Prof. T.G. Sitaram) यांनी दिली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाकिची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.  

या योजनेचा शुभारंभ करताना सीताराम म्हणाले की, "या योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत प्रतिपूर्ती आधारावर दिली जाईल. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास, देशांतर्गत प्रवास, नोंदणी शुल्क, व्हिसा अर्ज शुल्क, निवास आणि बोर्डिंग, विमानतळ कर, प्रवास, आरोग्य, विमा आणि स्पर्धा-संबंधित उपकरणे यासाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. योजनेअंतर्गत, विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा संघ (किमान २ आणि जास्तीत जास्त ६ सहभागी असलेला संघ) पात्र असणार आहे." 

हेही वाचा : अबब ! सोलापूर विद्यापाठात ५० गुणांच्या पेपरला विद्यार्थ्याला पडले ९९ गुण

SSPCA द्वारे ऑफर केलेल्या श्रेणी अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या विद्यार्थाला या योजनेला लाभ घेता येणार आहे. श्रेणी ‘अ’ अंतर्गत, एआयसीटीई तज्ञ समितीने वेळोवेळी जाहीर केलेल्या परदेशात आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली जाईल. ‘ब’ श्रेणीतील विद्यार्थ्यांना स्वतःहून दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे. ही योजना प्रतिभा जोपासण्यासाठी, उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी AICTE ची अटूट बांधिलकी दर्शवते." असेही सीताराम यांनी सांगितले. 

सीताराम म्हणाले, "ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वैयक्तिकरित्या किंवा संघ म्हणून भाग घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवकल्पना आणि स्पर्धेच्या संस्कृतीला चालना देणे हे गुण असणे आवश्यक आहेत. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करेल. यामध्ये आर्थिक सहाय्य, समुपदेशन आणि लॉजिस्टिक मार्गदर्शन यांचा समावेश आहे. या योजनेद्वारे, विद्यार्थ्यांना जगभरातील लोक, उद्योग नेते आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी नेटवर्किंग करण्याची संधी मिळेल.  ज्यामुळे आंतर-सांस्कृतिक समज आणि सहकार्याला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.