शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल 'या' वेळेत बंद राहणार

शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल 'या' वेळेत बंद राहणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती (Teacher recruitment) राबविले जात असून त्यासाठी पवित्र पोर्टलवर (pavitra portal) उमेदवार जाहिराती पाहून पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया करत आहेत. परंतु, बुधवारी (दि,7 ) दुपारी चार ते सहा या वेळेत मेन्टेनन्ससाठी पवित्र पोर्टल दोन तास बंद राहणार आहे, याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी कळविले आहे.

हेही वाचा: शिक्षक भरती अपडेट : उमेदवारांनी चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत; शिक्षण विभागाचे आवाहन

बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीला सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारी जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार आपल्या इच्छित ठिकाणी पसंतीक्रम देण्याची कार्यवाही करत आहे. अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ पसंतीक्रम नोंदवण्यासाठी सुरुवात केली. अगदी काही तासात हजारोंच्या संख्येने उमेदवार संकेतस्थळाला भेट देऊन भरती प्रक्रियेशी संबंधित माहिती भरत आहेत. मात्र,  दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी चार ते सहा वेळेत पोर्टल बंद राहणार आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी कळविले आहे.