एफसी, एसपी, बीएमसीसी,गरवारे, मॉडर्न कॉलेजचे प्रवेशाचे कधी होणार सुरू ? जाणून घ्या एका क्लिकवर  

पुणे शहरातील फर्ग्युसन, बीएमसीसी, गरवारे, मॉडर्न आणि स.प. महाविद्यालयांसह इतर नामांकित महाविद्यालयांनी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मेजर व मायनर विषय निवडावे लागणार आहेत.

एफसी, एसपी, बीएमसीसी,गरवारे, मॉडर्न कॉलेजचे प्रवेशाचे कधी होणार सुरू ? जाणून घ्या एका क्लिकवर  
college admission open

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता बारावीचा निकाल (12th result) जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील फर्ग्युसन, बीएमसीसी, गरवारे, मॉडर्न आणि स.प. महाविद्यालयांसह (Fergusson , BMCC , Garware, Morden, Sp College)  इतर नामांकित महाविद्यालयांनी आपली प्रवेश प्रक्रिया (admission open ) सुरू केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) विद्यार्थ्यांना मेजर व मायनर विषय (major minor subject) निवडावे लागणार आहेत. त्यासाठी सुद्धा महाविद्यालयातर्फे समुपदेशन वर्ग व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.                          

हे ही वाचा:  अकरावी प्रवेशाचा अर्ज भरला का ? आत्तापर्यंत ६० हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

  देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना तीन व चार वर्षाचे डिग्री प्रोग्राम उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषयांची निवड करता येणार आहे. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी मेजर व मायनर विषयाबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन वर्ग ठेवले आहेत.
 फर्गुसन कॉलेज : 
फर्ग्युसन महाविद्यालयाचे बीए बीएससी व युवक या अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज २७ मे ते १० जून या कालावधीत भरता येणार आहेत.
*प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वसाधारण यादी १४  जून रोजी प्रसिद्ध होईल.
* विद्यार्थीच्या प्रवेश अर्ज बाबतच्या हरकती १४  ते १६  जून पर्यंत स्वीकारल्या जातील.
* २०  जून रोजी प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
* विद्यार्थ्यांना विषय निवडीचे व प्रवेश याबाबतचे समुपदेशन करण्यासाठी येत्या २९ मे रोजी महाविद्यालयाच्या मुख्य इमारती जवळ सकाळी १० ते १२.३० या वेळेत समुपदेशन केले जाणार आहे.
* फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी अभ्यासक्रमाच्या ५७० जागा उपलब्ध आहेत.
* फर्ग्युसनचे सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे: बीएस्सी मायक्रोबायोलॉजी, बीएस्सी एन्व्हायरमेंटल सायन्स, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएस्सी मायक्रोबायोलॉजी, बीएस्सी ॲनिमेशन, बी.व्होक मीडिया अँड कम्युनिकेशन, बी.व्होक डिजिटल आर्ट्स अँड अनिमेशन ,बी.व्होक इंटरियर डिझाईन, बी.व्होक.फॅशन टेक्नॉलॉजी                         
  * प्रवेशाची अधिक माहिती www.fergusson.edu या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 ----------
बीएमसीसी : 
बीएमसीसी मधील विविध प्रवेशाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना येत्या पाच जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील . 
 
* प्रवेश अर्ज भरण्याची लिंक : https://registration.deccansociety.org/Registration/Apply/BMCC

* प्रवेश अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे यादी ८ जून रोजी प्रसिद्ध होईल.

* प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १४ जून रोजी प्रसिद्ध केले जाईल.
--------
एस.पी.कॉलेज : 
एस पी कॉलेजमध्ये बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए आदी अभ्यासक्रमासाठी येत्या १ ते १५ जून या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
* कोणत्या अभ्यासक्रमास किती जागा उपलब्ध आहेत याबाबतची माहिती कॉलेजच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* मेजर व मायनर विषय निवडीबाबत विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑफलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे.
-----------
आबासाहेब गरवारे कॉलेज : 
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातर्फे बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएससी बायोटेक्नॉलॉजी ,बीसीए आदी अभ्यासक्रमासाठी येत्या २९ मे रोजी प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

--------------
मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर

मॉडर्न महाविद्यालयातर्फे विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १३ जून पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

मॉडेल कॉलेजच्या moderncollegepune.edu.in या संकेतस्थळावर प्रवेश याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo